sudhir mungantivar
sudhir mungantivar

मोदी-ठाकरे भेट; ठाकरे सरकारवर मुनगंटीवारांनी केली 'हि' टीका

Published on

चंद्रपूर : पंतप्रधान- मुख्यमंत्री PM CM भेटीवर भाजप BJP नेते सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantivar यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीत मराठा- ओबीसी आरक्षणावर मुख्यत्वे चर्चा अपेक्षित होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर  12 विषय मांडत गांभीर्य घालविल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. Modi-Thackeray meeting; Criticism of Mungantiwar 

मराठा- ओबीसी आरक्षणाच्या Reservation संदर्भात न्यायालयात योग्य बाजू मांडू न शकल्याने ही परिस्थिती उदभवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विषयाचे स्वागत आहे. मात्र शिवसेनेने Shivsena जाहीरनाम्यात मराठी विद्यापीठ,सांस्कृतिक विद्यापीठ, विधानसभेतील मराठी कामकाज देण्याचे ठरविले होते. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आजही शासकीय अध्यादेश इंग्रजीत निघत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. या सरकारला केंद्राकडे बोट दाखवताना स्वतःच्या कर्तव्याचा विसर पडल्याचे मत मुनगंटीवार यांनी मांडले. Modi-Thackeray meeting; Criticism of Mungantiwar 

हे देखील पहा -

जीएसटी परताव्या संदर्भात 'कर्ज घ्या व्याज आम्ही भरु' असे केंद्राने आधीच सांगितल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे,  मात्र राज्य सरकार निष्क्रीय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com