'लुडो' खेळावरून मनसेची उच्च न्यायालायत याचिका

ludo
ludo
Published On

घरी बसलेले असू द्या किंवा प्रवासामध्ये सध्या सर्वसामान्यांमध्ये लुडोची क्रेस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.  आता या गेमच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. 'लुडो' कौशल्याचा नव्हे तर नशिबाचा गेम म्हणून घोषित करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे. 22 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.(MNS petition to High Court over 'Ludo' game)
 
मुंबईत बस रेल्वे व अन्य खासगी वाहनातून प्रवास करणार्‍यांमध्ये बघायला मिळत आहे.  हाच खेळ सुप्रिम या मोबाईल अॅपवर पैसे लावूना खेळण्यात येत असून जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3, 4 आणि 5 अन्वये हा गुन्हा आहे. त्यामुळे या मोबाईल अँपच्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनसेचे पदाधिकारी केशव मुळे यांनी व्ही.पी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे देखील पाहा

मात्र, मुंबई पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तेव्हा त्याविरोधात मुळे यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने 'लुडो' हा कौशल्याचा खेळ असल्याचं मान्य करत एफआयआर नोंदवण्याची मागणी फेटाळून लावली. या निकालाला याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत अँड. निखिल मेंगडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे.

काँग्रेसने कॅबिनेट मधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर
 
याचिकेतील माहितीनुसार इथं चारजण एकत्र येऊन 5-5 रुपयांची पैज लावून हा खेळ खेळतात. त्यातील विजेत्यास 17 रुपये तर अँप चालकांना त्या मोबदल्यात 3 रुपये मिळतात. लुडोसारख्या गेमचं रुपांतर जुगारामध्ये होत असून तरुण पिढी याकडे आकर्षित होत आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीनं हायकोर्टात मांडण्यात आली. तसेच 'लुडो'चा डाव हा डाईस टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून तो नशिबाचा खेळ आहे.

जेव्हा, लुडो खेळताना बोली लावली जाते, तेव्हा हा खेळ न उरता तो जुगाराचं स्वरुप घेतो, असा दावाही याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. त्याची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी 22 जूनपर्यंत तहकूब केली.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com