Suraj Chavan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Movie: बिग बॉस फेम सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट कधी होणार रिलीज, जाणून घ्या

Bigg Boss Fame Suraj Chavan Movie: बिग बॉस मराठी ५" विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याची मुख्य भूमिका असलेल्या "झापुक झुपूक" चित्रपटाचा पोस्टर आज रिलीज झाला आहे.

Manasvi Choudhary

'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी कौटुंबीक मनोरंजन असलेली ( लव स्टोरी/ युवा लव्हस्टोरी) घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत.

'बिग बॉस मराठी ५" विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याची मुख्य भूमिका असलेल्या "झापुक झुपूक" चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रिलिज करत, निर्मात्यांनी आज चित्रपटाची आणि प्रदर्शनाच्या तारखेची अधीकारीक घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुहूर्त पूजेचे फोटो शेअर केले होते ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. सूरज चव्हाण बरोबरच जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे मुख्य भूमिकेत झळकणार असून सध्या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे.

चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की,"सुरज चव्हाण यांच्या बरोबर बिग बॉस मराठी जेंव्हा केलं तेंव्हाच मला वाटलं की, माझ्याकडे जी एक गोष्ट आहे त्यासाठी हाच उत्कृष्ठ कलावंत आहे. बाईपण भारी देवाच्या निमीत्ताने मी आणि जिओ स्टुडिओज ने प्रेक्षकांचे मनोरंजन करुन भरघोस यश मिळवलंय आणि आता आमच्यावर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे. मला खात्री आहे की झपुक झुपूक व्दारे आम्हीं ही प्रथा अशीच सुरु ठेवू. एक कुठलीतरी गोष्ट करेक्ट झाल्यानंतर अधिक जोमाने आणि फोकस्ड काम करण्याची गरज असते. म्हणूनच गेली दीड वर्ष आम्हीं थांबलो होतो, आता जो चित्रपट लोकांसमोर येईल तो संपूर्ण प्रेक्षक कुटुंबाचं मनसोक्त मनोरंजन करेल, असा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि मला खात्री आहे की, मी आणि जिओ स्टुडिओज जर पुन्हा एकत्र आलो तर लोकांचा विश्वास जो आमच्यावर होता तो असाच पुढेही राहील."

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित,  निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत दाखल होण्यास सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT