password
password 
web-special-news

तुमचा पासवर्ड सुद्धा "हा" आहे का? आत्तापर्यंत सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड

अक्षय कस्पटे

मुंबई: गेल्या दशकभरापासून इंटरनेटचा Internet वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. इंटरनेट वापरणे देखील गट सोप्पे होऊ लागले.  इंटरनेट  च्या जगात अनेक अॅप्स Apps  बाजारात आले.  त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा  प्रश्नांसाठी  आणि सेक्युरिटी साठी त्यांना पासवर्ड Passward ठेवण्याची सुविधा देण्यात आली. इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते.

सध्याच्या डिजिटल (digital) युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. सध्या इतके अॅप्स आहेत कि प्रत्येकासाठी वेगळा ठेवावा लागतो. परंतु जेव्हा ते पससवर्ड लॉगिन करताना  तेव्हा आठवून आठवून डोक्यात चक्करच येते. परिणामी, एखादा सोप्पं पासवर्ड ठेवून मोकळे होतात. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो... पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहत असते. पासवर्ड संबधित एका संशोधनातून अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. मागील 12 महिन्यात या संशोधनातून जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत.Worlds most common Top 10 Passwords that people set in their phone 

हे देखील पहा -

विविध अकाऊंटसाठी Account अनेकजण एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स सहजरित्या क्रॅक करु शकतात. आणि काही हॅकर्स हे हॅक करण्यासाठीच बसलेले आहेत. यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (NCSC) नुकतीच एक आकडेवारी जारी केली आहे. जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड '123456' आहे. आणि तो सहजरित्या हॅक केला जाऊ शकतो, असं यात समोर आले आहे.

पासवर्ड आणि सायबर सिक्योरिटीबाबात यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे (NCSC) टेक्निकल डायरेक्टर डॉ. लैन लेवी यांच्यामते एकच पासवर्ड नेहमीसाठी वापरणेही धोकादायक आहे. एकच पासवर्ड विविध खात्याला आणि वारंवार वापरल्यास तो हॅक लवकर होऊ शकतो. असे डॉ. लैन लेवी यांनी सांगितले आहे.  यांच्यामते स्वतःचे पहिले नाव, आवडीच्या खेळाडूचे नाव, स्वतःची जन्मतारीख यासारखे पासवर्ड कधीही ठेवू नका. हॅकर्स हे पासवर्ड कोणत्याही आणि कसल्याच अडचणीशिवाय हॅक करु शकतील. काही युजर्स बॅटमॅन आणि सुपरमॅन फुटबॉल टीम, यांसारखे तसेच, सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात.

 या 12 महिन्यात सर्वाधिक वापरलेले पासवर्ड -

  • 123456
  • 123456789
  • qwerty
  • password
  • 111111
  • 12345678
  • abc123
  • 1234567
  • password1
  • 12345

Edited By - Sanika Gade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT