यवतमाळ : कोरोना Corona संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह Maharashtra प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये ITI College असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाने शोधमोहीम राबवून सापडलेल्या काही रूग्णांना गृहविलगीकरणात ठेवले.
यवतमाळ जिल्ह्यात Yavatmal दररोज कोरोनाबाधितांची संख्या सरासरी एक हजाराने वाढत आहे. आज शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये ITI College तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला Covid Centre दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, काल शनिवार) या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधित पळून गेल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालीची जमीन सरकली आहे. या संदर्भात घाटंजी पोलीस Police ठाण्यात तक्रार नोंदविली आहे . आज तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धर्मेश चव्हाण हे आपल्या चमूसोबत आमडी या गावात जाऊन कोरोना रुग्णाणाचे समुपदेशन करून कोरोना सेंटरला वापस आणण्याचा प्रयत्न करणार आहे. Twenty Corona Positive Patients ran away from Yavatmal Covid Centre
रुग्णाणाच्या पलायनाने तालुक्यात संसर्गाचा धोका वाढला आहे. पलायन केलेले रुग्ण हे आमडी गावाचे रहिवासी आहेत तालुका आरोग्य यंत्रणेने या रुग्णांचा गावागावात आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा सेविका यांच्यामार्फत शोध घेणे सुरू केले आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.