World Cup Viral Song Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Cricket Song: वर्ल्डकप फायनलसाठी तरुणांनी तयार केलं स्पेशल गाणं; तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका!

World Cup Viral Song: भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World Cup Viral Song Video

भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. अशातच काही तरुणांनी भारतीय संघाच्या विजयासाठी खास गाणं तयार केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताच्या उपांत्यफेरीच्या दिवशीही एकत्र जमलेल्या क्रिक्रेट प्रेमींनी टीव्हीवर एकत्रित सामना पाहण्याचा आनंद घेतला. तसंच रविवारचा अंतिम सामना पाहण्यासाठी काही ठिकाणी लाइव्ह स्क्रिनिंग केलं जाणार आहे. काही मुंबईकरांनी जवळच्या रिसॉटवर तसंच स्पोर्टस् बार, पब, मॉलमध्ये जाऊन अंतिम सामना पाहण्याची योजना आखली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की, काही तरुण एका बेडवर बसलेले आहेत. या तरुणांनी मस्त असे रंगीबेरंगी कुर्ता पायजामा परिधान केले आहेत. हे खालस गाणं भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि संघातील इतर खेळाडूंसाठी बनवण्यात आलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय राहणार नाही

हा व्हिडीओ @wajahathasan या इन्टांग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तसंच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीयाही येत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये भारतीय संघाला रविवारच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्यात. व्हिडीओ पोस्ट होताच व्हिडीओला हजारोंच्या घरात व्हूज आणि लाईक्स् मिळालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

SCROLL FOR NEXT