Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अबब! फिरत्या पाळण्यातून जोरदार पडली अन् लोखंडी जाळीत अडकून बसली; जत्रेतील थरार कॅमेऱ्यात कैद

Viral Video: सोशल मीडिया सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणीसोबत भयंकर अशी घटना घडली आहे.

Tanvi Pol

Uttar Pradesh Video: देशभरातील विविध ठिकाणी काही निमित्ताने मोठ-मोठ्या यात्रा होत असतात. मग यात्रेमुळे आकाश पाळणे असतील किंवा अनेक मोठ-मोठे पाळणे लागत असतात. प्रत्येक नागरिक पाळण्यात बसण्याचा आनंद घेतात, मात्र बऱ्याच वेळा याच यात्रेत अपघात होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी आकाश पाळण्यातून पडते आणि पाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर अकडकली जाते. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण यात्रेचा परिसर दिसत असून जागोजागी अनेक आकाशपाळणे आहेत मात्र त्यात एका मोठ्या आकाशपाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर एक तरुणी लटकलेली दिसत आहे. संपूर्ण दृश्य पाहून तेथील प्रत्येकजण घाबरुन गेलाला आहे त्यात एका व्यक्तीने संपूर्ण घटना(Incident) आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील  लखीमपूर खिरी येथील आहे. मात्र घटनेचा व्हिडिओ ''@BmjJatav'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. घटना कधी घडली हे समजू शकलेले नाही मात्र सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पाहिली जात आहे.

व्हायरल होत असलेली घटना पाहून प्रत्येक नेटकरी हैराण झालेले आहे. मात्र त्यातही अनेक यूजर्संनी कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बाबा हे काय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' खूप भयानक'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Maharashtra News Live Update: राहुल गांधींसह खासदार गांधी स्मृतीस्थळी दाखल

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT