Arm Wrestling Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर घटना! पंजा लढवताना तरुणाचा हातच मोडला; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Viral Video News: शाळा, महाविद्यालय, सण- समारंभातही अनेकदा पंजा लढवण्याची पैज लागते. मात्र हा खेळ वाटतो तितका सोपा नाही. अनेकदा पंजा लढवताना गंभीर दुखापतही होते.

Gangappa Pujari

Arm Wrestling Viral Video:

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील अनेक व्हिडिओ इतके भयंकर अन् थरकाप उडवणारे असतात की पाहताना अंगावर काटा उभा राहतो. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये पंजा लढवताना एका तरुणाचा चक्क हातच मोडल्याचे दिसत आहे.

पंजा लढवणे हा ताकदीचा खेळ आहे. अनेक ठिकाणी पंजा लढवण्याच्या स्पर्धा भरतात तर काही ठिकाणी मजा म्हणून हा खेळ खेळला जातो. शाळा, महाविद्यालय, सण- समारंभातही अनेकदा पंजा लढवण्याची पैज लागते. मात्र हा खेळ वाटतो तितका सोपा नाही. अनेकदा पंजा लढवताना गंभीर दुखापतही होते.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाला पंजा लढवण्याची स्पर्धा चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. या तरुणाचा पंजा लढवताना हातच मोडला. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की पाहताना अंगावर काटा उभा राहतो.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणांमध्ये पंजा लढवण्याची स्पर्धा सुरू आहे. दोघेही टेबलवर बसून एकमेकांची ताकद आजमावत पंजा लढवत आहेत. अचानक एका तरुणाकडून प्रतिस्पर्धी तरुणाच्या हातावर जोराने दाब दिला जातो अन् त्याचा हातच मोडतो. या घटनेने त्यांच्या बाजूला बसलेले तरुणही घाबरुन जातात.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशी रिस्क न घेण्याचे आवाहन केले आहे. तर काही जणांनी खेळताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT