Funny Video Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Funny Video Viral : हा व्हिडिओ बघून हसू येईल, पण वाईटही वाटेल! झोका घेता-घेता झाडाची फांदी तुटली, तरुणाचं काय झालं बघा!

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक विनोदी आणि हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

आपण जितके जास्त हसतो तितकेच आपले आयुष्य वाढते असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला हसवणे आयुष्यात तितकेसे सोप्पे नाही. अशात सोशल मीडियावर नेहमीच अनेक विनोदी आणि हस्यास्पद व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक लठ्ठ तरुण धाडकन झाडावरून खाली पडला आहे. त्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा पोट दुखेपर्यंत हसाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका मोठ्या वृक्षाला सुंदर झोका बांधला आहे. आता नक्कीच हा झोका लहान मुलांसाठी असणार किंवा मग तरुण तसेच जास्तीत जास्त ५० किलोच्या व्यक्तींसाठी असणार. मात्र त्यावर एक जाड आणि लठ्ठ मुलगा बसतो आणि झोका घेऊ लागतो. झोका घेत असताना त्याला बांधलेली दोरी तुटते आणि तरुण येथून जोरात खाली पडतो.

हा तरुण १५० ते २०० किलो वजनाचा असावा असं व्हिडिओ पाहून वाटत आहे. आता एवढं जास्त वजन झाडाच्या फांदीला कसं झेपणार? हा लठ्ठ तरुण इतक्या जोरात आणि मजेत झोका घेतो की, तो खाली जोरदार आदळतो. झोका घेताना आणि खाली पडतानाचा त्याचा व्हिडिओ एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

@marathiasmitaofficial या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत यावर बिचाऱ्या झाडाची काय चूक, असं मजेशीर कॅप्शन देखील दिलं आहे. भावा तू आता झोक्याचा नाद सोड, कारण झाड खूप कमी राहिलेत, चूक त्या झाडाची नाही ...चूक त्या जाड्याची आहे, ते सगळं ठीक आहें त्या झोक्याची दोरी कुठे भेटलं ते सांगा लय मजबूत आहें. शेतीमध्ये कामी येईल, अशा अनेक भन्नाट आणि अतरंगी कमेंट यावर करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT