CCTV VIDEO Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV VIDEO: कार बाजूला घेण्यावरून दोघांमध्ये वाद; तरुणाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला

Crime News: रस्त्यावरील कार बाजूला घेण्यावरून वाद घालत एका व्यक्तीवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. शुल्लक कारणावरून दोन तरुणांनी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बेसबॉल स्टिकने हल्ला केलाय.

Ruchika Jadhav

संजय राठोड

Yavatmal News:

यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. रस्त्यावरील कार बाजूला घेण्यावरून वाद घालत एका व्यक्तीवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. शुल्लक कारणावरून दोन तरुणांनी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बेसबॉल स्टिकने हल्ला केलाय.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ शहरातील वीर सावरकर चौकात ही घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.राहुल कराळे असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते डाक सेवक असल्याची माहिती मिळाली आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, रस्त्याने जात असलेल्या एका तरुणाच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या चारचाकी वाहन चालकाने अडवलं. त्यानंतर कार बाजूला घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादामध्ये राग अनावर झाल्याने दुसऱ्या कारमधील तरुणाने आपल्या कारच्या डिक्कीतून एक लाकडी दांडका बाहेर काढला.

मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने हा लाकडी दांडका दुसऱ्या वाहनातील व्यक्तीच्या डोक्यावर मारला. जोरदार घाव केल्याने तो जागेवरच कळवळला. जखमी व्यक्तीला तेथेच सोडून या व्यक्तींनी तेथून पळ काढला. जखमी व्यक्तीवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT