Workers cooking on wooden stove saam tv
व्हायरल न्यूज

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडर संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Workers cooking on wooden stove: चेन्नईतील एका कंपनीतील मजूर गॅस सिलेंडर संपल्यामुळे लाकडी चुलीवर स्वयंपाक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कठीण परिस्थितीत त्यांनी काढलेला हा जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

Surabhi Jayashree Jagdish

युद्धाचा परिणाम आता भारतावर देखील होत असल्याचं चित्र दिसून येतंय. देशातील काही भागांत एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची चर्चा सुरू आहे. असं असतानाच चेन्नईतील एका कंपनीत काम करणाऱ्या मजुरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गॅस संपल्यामुळे मजूर अगदी लाकडी चुलीवर स्वयंपाक करताना दिसतायत. कठीण परिस्थितीत हार न मानता त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेत केलेला हा जुगाड चर्चेचा विषय ठरलाय.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोबाईलवरून संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड करताना दिसतोय. शूट करणारा व्यक्ती सांगतोय की, हा व्हिडिओ चेन्नईतील एका कंपनीचा आहे. तिथे गॅस सिलेंडर पूर्णपणे संपल्यामुळे मजुरांना जेवण बनवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागला. अनेक मजूर रांगेत लाकडी चुली लावून त्यावर जेवण बनवताना दिसतायत. या मजुरांपैकी बहुतेकजण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचीही माहिती आहे.

गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी पारंपरिक पद्धतीचा वापर करत लाकूड आणि कोळशाच्या मदतीने चुली पेटवल्या. या चुलींवर कर्मचाऱ्यांनी स्वयंपाक सुरू केला. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती स्वयंपाक करत असलेल्या एका मजुराशी बोलते. तो मजुराला विचारतो की अशा पद्धतीने स्वयंपाक करताना कसं वाटतंय. त्यावर तो मजूर हसत उत्तर देतो की "छान वाटत आहे, हे मोदीजींचं गिफ्ट आहे." त्याच्या या प्रतिक्रियेनंतर आजूबाजूचे इतर मजूरही हसताना दिसतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, देसी जुगाड नंबर १ असतो. तर एका युजरने म्हटलंय की, इतक्या मोठ्या कंपनीची ही हालत झालीये.

या व्हिडिओची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र तरीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गॅस संपल्यानंतरही मजुरांनी पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून जेवण बनवण्याचा मार्ग काढला, हे दृश्य अनेकांना आश्चर्यचकित करणारं ठरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT