Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : उन्हाचा पारा वाढला, महिलेने थेट स्कूटीच्या सीटवर बनवले गरमागरम डोसे, पाहा VIDEO

Cooks Dosa On Seat Of Scooter : महिलेची ही भन्नाट रेसिपी एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

राज्यासह देशभरात सध्या उन्हाचा कहर झाला आहे. उष्णता इतकी वाढली आहे की, असं वाटत आहे सूर्य आग ओकत आहे. वाढत्या उष्णतेमध्ये देखील नागरिकांचे अतरंगी किस्से काही कमी होत नाहीयेत. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून महिलेच्या लढवलेली शक्कल पाहून हसावं की कौतुक करावं असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

उन्हाळा सुरू झाला की, अनेक महिला कुरडया, पापड्या असे विविध पदार्थ बनवत असतात. उन्हाळ्यात केलेली ही वाळवणे वर्षभर टीकतात. उन्हाळ्यात कुरडया आणि पापड्या बनवल्याचे तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल तुमच्या घरी देखील तुमची आई असे पदार्थ बनवत असेल. मात्र उन्हाच्या उष्णतेवर तुम्ही डोसा बनवलेलं पाहिलं आहे का?

उन्हाचा कहर झाल्याने वाहने देखील तापतात. स्कूटीला असेली सीट देखील प्रचंड गरम होते. अशावेळी या सीटवर बसून वाहने चालवणे फार कठीण होते. मात्र या महिलेने याचाही फायदा कसा करून घेता येईल असा विचार केला. तिने थेट घरातून डोस्याचे बॅटर आणले. त्यानंतर स्कूटीच्या सीटवर महिलेने मस्त डोसे बनवून घेतले.

महिलेची ही भन्नाट रेसिपी एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. @ballari.updates या इस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडिओवर तामीळ भाषेत कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच केरळ, बंगळुरू किंवा तामिळनाडू सारख्या ठिकाणचा असावा.

या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर उन्हाळ्यातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये एका महिलेने उन्हाच्या किरणांवर चहा बनवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT