मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे घड्याळाच्या काट्यावरची धावपळ, त्यातच ट्रेनच्या डब्यात तुफान गर्दी. जागा पकडण्यासाठी अनेकांची धडपड आणि जीवावर उदार होऊन केला जाणारा प्रवास या सर्व गोष्टी आठवतात. चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका, अशा सूचना वारंवार रेल्वेप्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, तरी देखील प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. (Latest Marathi News)
सध्या गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडताय. त्यामुळे ट्रेनमध्ये मोठी गर्दी होत आहे. असाच एका गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video) मुंबई लोकलच्या एका महिला डब्यामधला आहे.
या व्हिडीओत अनेक तरुणी तसेच महिला धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) धावती लोकल पकडतांना पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे जागा पकडण्यासाठी महिला एकमेकांना धक्का बुक्की देखील करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
तर काहीजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या स्थानकावरचा आहे. हे अद्यापही समोर आलेलं नाही. Tripti / तृप्ति नावाच्या X अकाउंटवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल २ लाखांहून अधिक जणांनी बघितला आहे.
दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये चढताना झालेल्या अपघातात अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशा घटना घडून नये म्हणून रेल्वेप्रशासनाने ठिकठिकाणी सुरक्षा बलाच्या जवानांना तैनात केलं आहे. मात्र, महिलांच्या या धावपळीचा व्हिडीओ पाहून सुरक्षा जवान तरी काय करणार? असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करीत आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.