Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे बाप! महिला चक्क उकळत्या तेलात हात घालून तळतेय पदार्थ; VIDEO पाहून बसत नाही विश्वास

Shocking Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा शॉकिंग व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क ती तेलात भजी तळताना दिसतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Puts Hand In Boiling Oil

आपल्यापैंकी प्रत्येकालाच गरमागरम पदार्थ खाण्यास आवडतात. त्यातल्या त्यात गरमागरमवडापावचे नाव ऐकताच अनेकांच्या तोडाला पाणी सुटते. पण गरमागरम पदार्थातून निघणारी वाफही कोणालाच सहन होत नाही. स्वयंपाक करताना तेलाचा थेंब जरी अंगावर उडाला तरी किती त्रास होतो. पण तुम्ही कधी कोणाला उकळत्या तेलात कोणाला हात घालताना पाहिल आहे का?सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा शॉकिंग व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क ती तेलात भजी तळताना दिसतेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल प्लॅटफॉर्म व्हायरल व्हिडिओचा खजिना आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कधी लोकांचे अनोखे जुगाड पाहायला मिळतात तर कधी लोकांना आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायल मिळतात.व्हायरल होत असलेल्या या महिलेच्या व्हायरल व्हिडिओने आपल्या विचार करण्यास भाग पाडतील.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @thefoodiehatया इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या आधीही सोशल मीडियावर अनेक व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल झालेत जे चक्क उकळत्या तेलात पदार्थ तळत होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सुरुवातीस एक महिला वडापावसाठी एक छोटीशी हातगाडी घेऊन एका ठिकाणी लावते. त्यानंतर हातगाडीवर स्टो ठेऊन त्या स्टोव्हर ठेवून त्यावर कढई ठेवते. कढई ठेवून त्यात तेल ओतून तापवण्यास ठेवते. काही वेळानंतर एका भांड्यात वड्याचे पीठ टाकून तसेच पावाला सुरीने मधोमध कापून, त्यामध्ये वटाट्याची भाजी आणि चीज घालून पाव हाताने बंद करते

आता तो पाव वड्याच्या तयार केलेल्या पिठामध्ये बुडवून पाव तळण्यास कढईत टाकते.हा पदार्थ बनवणारी महिला तयार झालेला हा वडापाव गरमागरम तेलातून चक्क हाताने तळून काढूनएका कागदी डिशमध्ये काढून घेते. मग सुरीने तुकडे करून मधोमध कोरडी लाल चटणी आणि हिरवी मिरची घालून तो पदार्थ खाण्यासाठी देते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला यामध्ये कोणतीही दुखापत होत नाही. व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,तरीही महिलेने तळण्यासाठी चिमटे किंवा गाळणीचा वापर करावा' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,हायजिन दिसत नाही'.व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT