mumbai local train women clash Saam tv
व्हायरल न्यूज

धावत्या लोकलमध्ये तुफान राडा, ग्रुपने दरवाजा अडवला; महिला थेट ट्रॅकवर कोसळली, VIDEO

mumbai local train women clash : धावत्या लोकल ट्रेनमध्ये ग्रुपने दरवाजा अडवल्याने प्रवासी ट्रॅकवर कोसळल्याची घटना घडली आहे. महिला डब्यातील या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचा राडा

धावत्या लोकलमधून महिला ट्रॅकवर कोसळली

महिला प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. जनरल आणि महिलांच्या डब्यातही गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत धक्का लागल्याने प्रवाशांच्या हाणामारी झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. परंतु आता किरकोळ प्रवासी असलेल्या ट्रेनमध्येही प्रवाशांच्या वादाची घटना समोर आली आहे.

ठाणे आणि कळवादरम्यान महिलांच्या डब्यात प्रवाशांचा वाद झाला. सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रिकामी असतानाही ४ ते ५ प्रवाशांनी दरवाजा अडवला होता. हे प्रवासी प्रवाशांना डब्यात चढून देत नव्हते. याच वादातून एक महिला धावत्या ट्रेनमधून खाली कोसळली. दरावाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांनी महिलेला डब्यात येण्यापासून रोखले. त्यानंतर तिच्याशी हुज्जत घातली. या घटनेने रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

लोकल ट्रेनमधील डब्यात महिला दिसून येत आहेत. महिला डब्यातून कोसळल्यानंतर इतर महिला प्रवासी दरवाज्यांवर उभ्या असलेल्या महिलांना भांडताना दिसत आहेत. धावत्या लोकलमधून महिला कोसळल्यानंतर एक महिला चैन ओढताना दिसत आहे. लोकलमधील या राड्यामुळे डब्यात गोंधळाचं वातावरण दिसतंय. या दुर्घटनेनंतर ट्रेनपुढील स्टेशनवर थांबते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेनच्या डब्याचा दरवाजा अडवणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी रेल्वे काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमध्येही एका गुंडाने निष्पाप प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या गुंडाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटीचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी गुंडाच्या मुसक्या आवळल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमधील वाढत्या वादाच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic : यशच्या 'टॉक्सिक'मध्ये ग्लॅमरचा तडका; नयनतारा, कियारासह पाच अभिनेत्रींची दमदार एंट्री

Maharashtra News Live Update: मुंबई - गोवा महामार्गावरील लांजा येथील वेरळ घाटात कोसळली दरड

Sachin Ahir: मोठी बातमी! सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती, एकमताने झाली बिनविरोध निवड

Gold Price Today: सोन-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोनं २००० तर चांदी २५०० रुपयांनी स्वस्त; वाचा लेटेस्ट दर...

Mumbai rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा धुमाकूळ; रस्ते पाण्याखाली- नागरिकांचे हाल, पुढचे २ दिवस सतर्कतेचे

SCROLL FOR NEXT