aira rawat viral mystery girl Saam tv
व्हायरल न्यूज

वर्ल्ड कपमधील मिस्ट्री गर्ल कोण? फोटो पाहून लाखो फॉलोअर्स पडले प्रेमात? VIDEO

aira rawat viral mystery girl : व्हायरल होत असलेल्या मेसेजची, फोटोंची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होतोय...एका रात्रीच तिचे लाखो फॉलोअर्स वाढलेयत...खरंच ही मिस्ट्री गर्ल वर्ल्डकप मॅच पाहायला गेली होती का...? या फोटोमागचं सत्य काय? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

टी 20 क्रिकेट मॅच दरम्यान व्हायरल होत असलेल्या या मिस्ट्री गर्लच्या प्रेमात लाखो चाहते पडलेयत...निळ्या रंगाची टी शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या स्कर्टमधील हा फोटो आहे...या मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होताच काही तासातच तिचे फॉलोअर्स साडे 3 हजारावरून तब्बल साडे 3 लाख झालेयत...भारत-अमेरिका सामन्यातून व्हायरल झालेल्या आयरा रावतच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीय...पण, खरंच ही आयरा रावत आहे का...?

भारत-अमेरिका सामन्यावेळी ही आयरा खरंच स्टेडियममध्ये उपस्थित होती का...? आयरा मॉडेल आहे का...? एवढी सुंदर दिसणारी आयरा नक्की कोण आहे...? याचीच उत्सुकता युर्जसना आहे...त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...

त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आयरा रावत या तरुणीच्या फोटोने खळबळ माजवलीय. एका रात्रीत आयराला एवढी प्रसिद्धी मिळालीय की अनेक चाहते प्रेमात पडलेयत'.

हा मेसेज व्हायरल होतोय...आयरा ही खरी असेल तर या फोटोमुळे तिचं नशीब नक्कीच बदलेल...पण, काहींनी या फोटोवर शंकाही उपस्थित केलीय...त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...त्यावेळी आयराचा फोटोतील चेहरा हा एकदम तुकतुकीत दिसतोय...फ्रेमिंगचा विचार केला तर हा फोटो बनवल्याचं दिसतंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

आयरा रावतचा व्हायरल होणारा फोटो AI निर्मित

AI इन्फ्लुएंसर म्हणून तिचा फोटो वापरला जातो

आयरा रावत ही अस्तित्वात नसल्याची माहिती

AI इन्फ्लुएंसर हे प्रकरण नक्की काय आहे...? या फोटोमुळे हा विषय चर्चेत आलाय...त्यामुळे हेदेखील जाणून घेऊयात...

AI इन्फ्लुएंसर म्हणजे काय?

AI आणि 3D डिझाइन तंत्रज्ञानाचा वापरून तयार केलेले व्हर्च्युअल पात्र

व्हर्च्युअल पात्र सोशल मीडियावर सक्रिय असतात

ब्रँडचा प्रचार करतात, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात

लाखो फॉलोअर्स मिळवतात, पण त्यांचे खरे अस्तित्व नाही

लिल मिक्वेला हे या ट्रेंडचं एक उत्तम उदाहरण आहे. 2026 मध्ये एलए स्टार्टअप ब्रुडने तयार केलेले, लिल मिक्वेला यांनी मोठ्या ब्रँडसोबत काम केलंय...तिचे इंस्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स आहेत...अहवालांनुसार ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसली तरी ती दरवर्षी 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमावते...आयरा रावत हादेखील प्रकार असाच आहे...आमच्या पडताळणीत ही मिस्ट्री गर्ल खरी असल्याचा दावा असत्य ठरलाय...त्यामुळे कोणत्याही युजर्सने आता नीट काळजी घ्यावी...कारण, इंस्टाग्राम प्रोफाईल पाहून प्रेम करण्यापूर्वी ते एआय आहे की रिअल आहे ते तपासा...कारण यातून तुमची फसवणूकही होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठं अडलं? दादांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका, VIDEO

NCP President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा, प्रफुल्ल पटेलांनी बैठकीत जाहीर केलं नाव

Breaking News: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, १० वर्षे जुनी कार होणार जप्त

टीम इंडिया आणि पाकिस्तान टी२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा आमनेसामने येणार? काय आहे समीकरण?

TET Exam: भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या २ सख्ख्या भावांनी फोडला TET चा पेपर; २७ जणांच्या नाड्या आवळल्या

SCROLL FOR NEXT