Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : जुगाड करुन बसमध्ये सीट पकडायला गेला अन् धाडकन खाली कोसळला;पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर ट्रेन प्रवास असो बसप्रवास अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात पुन्हा एकदा असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सणासुदीचे दिवस असो बाहेर जाण्यासाठी बस किंवा ट्रेन असो रस्तेमार्गावर अनेक प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येते. या प्रवासा दरम्यान आपल्यापैंकी अनेकजण दररोज बाहेर जाण्यासाठी बसचा प्रवास करत असतो.त्यामुळे प्रवाशांच्या असलेल्या तूफान गर्दीमधून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते.

मात्र काही महान प्रवाशी (passenger)असे असतात की जे प्रचंड गर्दीमधून क्षक्कल लढवून स्वत:साठी जागा मिळवतात. मात्र सध्या अशाच एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो गर्दीतून स्वत:साठी जागा पकडण्याच्या नादात त्याची क्षक्कल त्याच्याच अंगलटी आली आहे.सध्या या प्रवाशाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एस्टी(Bus) स्थानकावरील असलेला वाटत आहे. त्यानंतर एक बस तिथे उभी असलेली दिसत आहे. बसच्या आजूबाजूला प्रवाशांची गर्दी दिसतेय. मात्र याच बसमध्ये चढण्यासाठी एक तरुण येतो आणि बसच्या खिडकीच्या मार्फत आत जाण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तो तरुण बसजवळ येतो आणि त्याच्याजवळ असलेली बॅग खिडकीतून आत देता त्यानंतर खिडकीतून वर चढण्याचा प्रयत्न करतो मात्र बसची खिडकीसह तो जमिनीवर कोसळतो. संपूर्ण व्हिडिओ समोरील बसमधील प्रवाशांने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @PowerTrain_YT या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाले आहेत. व्हिडिओवर एका यूजरने कमेंट(commented) केली आहे की,'भारतात या गोष्टी सारख्या होत असतात',अनेक यूजरने अनेक गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत,'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT