Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरीच्या डान्सने वऱ्हाडी कोमात; नवऱ्याला लागला 440चा करंट

Dance Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी लग्नातील गंमतीचे मात्र सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. इतरांपेक्षा आपले लग्न कसे हटके होईल याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. आधीच्या काळी जे नवरा-नवरीची कुटुंबातील मंडळी असतील फक्त ते लग्नात डान्स करत असत. मात्र अलिकडे एक नवीन फॅड आल आहे. जी के लग्नाच्या अगोदर किंवा नंतर नवरीचा डान्स झालाच पाहिजे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील नवरीचा डान्स व्हायरल होत आहे. जो व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल अशीच बायको पाहिजे.

सध्या लग्नाच्या अगोदर नवरा-( groom)नवरीचे अनोख्या अंदाजामध्ये फोटो शुट करणे. तसेच लग्नात नवरा-नवरीची हटके एन्ट्री असे फॅड गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. अनेकदा नवरा किंवा नवरीला डान्स येत नसतानाही ते हौस म्हणून डान्स करत असतात.परंतू या नवरा-नवरीकडची मंडळी मन लावून सर्व डान्स पाहत असतात. पंरतू सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नवरीचा डान्स पाहून 'नाचता येईना पण अंगण वाकडं' या म्हणीचा अर्थ पूर्ण होतो असे दिसते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहू शकता की, सर्व व्हिडिओ एका लग्नाच्या (Weeding)कार्यक्रमातील आहे. यात एक मोठा स्टेज आहे. मात्र याच स्टेजवर नवविवाहित नवरा-नवरी आहेत शिवाय एक महिला दिसून येत आहे. नवरदेवाच्या बाजूला काही पुरुष मंडळी आहेत. मात्र काही वेळातच नवरी स्टेजवर असलेल्या खुर्चीवरुन उठते आणि स्टेजवर उभी राहून डान्स करण्यास सुरुवात करते. जसा जसा नवरीचा डान्स पुढे जातो, तसं तसं तुम्हाला ही हसू आवरता येणार नाही

मात्र नवरी स्वत:चा खूप आनंदी झालेली दिसून येत आहे. नवरीचा डान्स पाहून नवरदेव तर कोमात गेलाच पण वऱ्हाडी मंडळींना 440चा करंट लागला असावा.कदाचित या नवरीला वाटलं असावं की मी सुद्धा गौतमी पाटील सारखी थिरकू शकते. त्यामुळे प्रयत्न केला असावा बहुधा. पण या नवरीच्या भन्नाट डान्सने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @mrbeen979619 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पंसतीस आलेला आहे. व्हिडिओ (Video)शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,' मौत आजाए लेकिन इतना कॉन्फिडन्स ना आए बस'.

-योगेश गायकवाड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT