Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video: ढोल-ताशा, बँड बाजा काहीच नाही, मग वरातीत गाण्यांचा आवाज कुठून येतोय? पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Barrati Dance On Headphone Video :

सध्या लगीनसराईचा सीझन सुरू झाला आहे.सध्या लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येकजण लग्नात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. आपले लग्न सगळ्यांपेक्षा हटके असावे असे अनेकांना वाटत असते. अशाच एका लग्नातील वरातीत वऱ्हाड्यांनी हेडफोन घालून गाण्यावर ताल धरला. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marahi)

लग्न म्हटलं की नवऱ्याची वरात ढोल-ताशाच्या तालावर काढली जाते. त्यात संपूर्ण कुटुंबिय अगदी मनमोकळेपणाने नाचतात. ढोल-ताशा, डिजेच्या तालावर नाचताना दिसतात. मात्र, एक वरातीत ढोल-ताशा नव्हे तर हेडफोनच्या तालावर वऱ्हाडीमंडळी नाचताना दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका वरातीत वऱ्हाडीमंडळी हेडफोन घालून नाचताना दिसत आहेत. हेडफोन घालून त्यावर ताल धरलेला दिसत आहे. या व्हिडिओला पाहून सर्वांनाच 'ये दिल है मुश्किल' चित्रपटातील ब्रेकअप साँग आठवलेच असेल. त्यातही अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरने हेडफोन घालून पार्टी करताना दिसतात. आजकाल हेडफोन घालून पार्टी करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यात लोक हेडफोन घालतात. त्यात गाणे सुरू असते आणि त्यावर लोक नाचतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीपर्यंत या गाण्यांचा आवाज पोहचत नाही. पण आता हा ट्रेंड लग्नातील वरातीतदेखील पाहायला मिळत आहे.

shefooodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'ये दिल है मुश्किलसारखी पार्टी कधी अनुभवायला मिळेल', असा विचारही केला नव्हता, असं कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आले आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT