Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : नवरा-नवरीचा स्वॅगच भारी; अंगाला आग लावून घेतली मंडपात एन्ट्री

Bride Groom Entry With Fire : काही तरी युनीक आणि रावडी करायचं म्हणून या दोघांनी फायर सेफ्टीसह अशा पद्धतीने फायर गेम खेळत एन्ट्री केली आहे. या दोघांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

सध्या लग्नाचं सिजन सुरू आहे. लग्नसराईमुळे दर २ दिवसांनी लग्नातील अतरंगी विधी, परंपरा किंवा भांडणांसह डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लग्नाच्या दिवशी वधू आणि वर दोघेही स्वत:ला स्पेशल फिल करतात. या दिवशी दोघेही एकमेकांसह आलेल्या नातेवाईकांना काहीतरी हटके करून दाखवतात.

नवरा आणि नवरी यांची पहिली एन्ट्री खास असते. दोघेही या एन्ट्रीसाठी विविध प्लानीग करतात. कुणी नाचत, वाजत गाजत एन्ट्री करतात तर काही जण गाणी गात एन्ट्री करतात. मात्र तुम्ही कधी आगीचा खेळ करत वधू आणि वराची एन्ट्री पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर शॉकींग व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओपाहून कदाचीत तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

कारण या कपलने थेट अंगावर आग घेऊन आगीसह एन्ट्री केली आहे. ही थरारक घटना त्यांचे सर्व नातेवाईक थक्क होऊन पाहत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी येणार म्हणून सर्व नातेवाईक आपल्या सीटवरून उठून उभे आहेत. सर्वजण या दोघांची वाट पाहत आहेत. तितक्यात समोरून नवरी आणि नवरदेव आग लागलेल्या अंगाने मंडपात दाखल होत आहेत.

काही तरी युनीक आणि रावडी करायचं म्हणून या दोघांनी फायर सेफ्टीसह अशा पद्धतीने फायर गेम खेळत एन्ट्री केली आहे. या दोघांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील विविध कमेंट केल्यात. या कमेंटमधून नेटकऱ्यांनी देखील सदर स्टंटवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आता आगीशील खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील काही कपल्सने असं फोटोशूट केलं आहे. काही दिवसांपूर्वी फायर पानची मोठी चर्चा होती. व्यक्ती आग असलेलं पान थेट आगीसकट खात होते. आजूनही अनेक ठिकाणी हे फायर पान मिळतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT