Water Training Video Saam TV
व्हायरल न्यूज

Water Training Video : वाहत्या पाण्यात समुहाने अडकलात तर कसा वाचवाल जीव? हवामान तज्ज्ञांनी शेअर केला VIDEO

Stormwater Training Video : आपत्कालीन परिस्थिती अत्यंत शांत आणि धीराने कृती केल्यास नागरिक आपला जीव वाचवू शकतात, असं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.

Satish Daud

सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण तयार झाले असून पर्यटनस्थळे गर्दींनी फुलून गेली आहे. अशातच पर्यटनासाठी गेलेल्या अनेकांचा धबधब्यात तसेच वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ताज्या घटनेबाबत बोलायचं झाल्यास लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेलं अख्खं अन्सारी कुटुंब वाहून गेलं.

लग्नाच्या पार्टीसाठी (Wedding Party)आलेलं कुटुंब पाण्याच्या प्रवाहाजवळ उभे राहून निसर्गाचा आनंद घेत होतं. पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे कुटुंब बरोबर पाण्याच्या मधोमध अडकलं. जीव वाचवण्यासाठी ५ लोक आटापिटा करीत होते. त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् सर्वच जण वाहून गेले.

ही थरारक घटना व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अशा घटनांपासून नेमकं कसं वाचावं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस होसळीकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपत्कालीन परिस्थिती अत्यंत शांत आणि धीराने कृती केल्यास नागरिक आपला जीव वाचवू शकतात, असं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे. वास्ताविक हा व्हिडीओ चीनमधील आहे. चीनने आपल्या नागरिकांना पुराच्या पाण्यात अडकल्यास कसं वाचावं याचं प्रशिक्षण दिलं आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ५ ते ६ जण पाण्यात उतरलेले आहेत. त्याचवेळी अचानक पुराचा लोंढा येतो. या लोकांना बाहेर पडणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ते एकमेकांना आधार देत साखळी करतात. पुरात अडकलेले लोक एकमेकांच्या पाठीमागे रांगेत उभे राहतात.

एका सक्षम माणसाला ते रांगेत पुढे ठेऊन त्याच्या मागे एकमेकांच्या खांद्यांना घट्ट पकडून उभे राहतात. यामुळे प्रचंड प्रवाह असूनही हे व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जात नाहीत. मानवी साखळी भेदून पाणी पुढे निघून जातं. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर हे व्यक्ती बाहेर पाण्यातून बाहेर पडतात. अशा प्रकारे ते आपला जीव वाचवतात, असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT