... तुम्ही दीर्घकाळ टीव्ही पाहात असाल तर सावधगिरी बाळगा...या तुमच्या सवयीमुळे तुम्ही किडनी गमावून बसाल... होय, जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून टीव्ही पाहिल्यामुळे किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं एका संशोधनातून सिद्ध झाल्याचा दावा केलाय... ऑस्ट्रेलिया, जपान आणि युके येथील शास्त्रज्ञांनी तब्बल 12 वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढलाय...त्यांनी काय दावा केलाय पाहुयात...
जे लोक अतिप्रमाणात टीव्ही पाहतात, त्यांच्या किडनीचे कार्य झपाट्याने खालावण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, टाईप 2 डायबेटीज असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. टीव्ही पाहणे हे मनोरंजनाचे एक साधन असले तरी, दीर्घकाळ टीव्ही पाहिणं किडनीवर बेतू शकतं... हे संशोधन ऑस्ट्रेलिया, जपान आणि युकेसह अनेक देशांतील शास्त्रज्ञांनी केलंय... टाईप 2 डायबेटीज असलेल्या लोकांना जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने किडनी खराब होण्याचा धोका जास्त असतो. असा दावा केलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही किडनी तज्ज्ञांकडून अधिक माहिती मिळवली...
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
एकाच जागी बसून राहण्याची सवय आरोग्यासाठी घातक
लठ्ठपणासोबतच डायबेटीज, ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो
दोन्ही आजार किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे
टीव्ही, मोबाईल पाहण्यासाठी वेळेची मर्यादा पाळली पाहिजे
दर अर्ध्या-पाऊण तासाने ब्रेक घेणे, थोडे चालणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचं आहे... टीव्ही पाहण्यामुळे थेट किडनीवर नुकसान होतं हे अद्याप सिद्ध झालेले नाही... पण, लठ्ठपणा, डायबेटीज आणि ब्लडप्रेशरमुळे किडनीचा त्रास वाढू शकतो... त्यामुळे आमच्या पडताळणीत जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून टीव्ही पाहिल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय...