Heavy Rain Saam Tv
व्हायरल न्यूज

Ratnagiri Heavy Rain: चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीला आला पूर

Heavy Rain: महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेली लावलेली आहे. काही भागात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झालेली आहे. त्यात अनुशंगाने सोशल मीडियावर पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील अन्य भागासह कोकण परिसरात पावसाची दमदाह हजेरी लागलेली आहे. सातत्याने पडणाऱ्या याच पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळा सुरु होताच काही नद्यांना पुराचे स्वरुप आले आहे. सोशल मीडियावर महाराष्ट्रातील विविध भागात पडणाऱ्या पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पुणे आणि मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्याताही सध्या पावसाचा जोर पहायला मिळत आहे. येत्या १९ जूनपर्यंत या जिल्ह्यासा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे धरण क्षेत्राही दमदार पाऊस कोसळत आहे. सध्या सोशल मीडियावर(Media) चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सलग २ तास कोसळल्याने आजुबाजूचे नदी नाले तुडुंब भरुन वहात होते. २ तासांनी पाऊस थांबला आणि' सर्वांनी सुटकेचा निःश्वास मोडला

दहा वर्षापूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस(Rain) पडला होता. त्यामुळे तिवरे येथील र्भेदवाडी येथील मातीचे धरण फुटल्यामुळे जीवित व वित्त हानी झाली होती. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यावर येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT