Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घराच्या गेटवरुन गळ्यातील सोनसाखळी खेचली, ११ सेकंदात चोरटा फरार अन् महिला बघतच राहिली; VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज जगभरातील अनेक घटना व्हायरल होत असतात. मग कुठे अपघात होतात तर कुठे चोरीच्या घटना घडतात. घडलेल्या संपूर्ण घटना कधी कॅमेऱ्यात कैद होतात तर कधी सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन जातात. सध्या सोशल मीडियावरही अशीच एका चोरीची धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. जिथे घराबाहेरूनच महिलेच्या गळ्यातून चैन चोरी केली आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक बंगला दिसून येत आहे. पुढे या व्हिडिओत एक महिला आहे जी बंगला आहे ज्याचा मेन गेट उघडताना दिसतेय. व्हिडिओत पुढे दिसते की महिला जेव्हा गेट उघते तेव्हा एक तरुण महिलेच्या समोर उभा असतो. मात्र त्यानंतर काही क्षणात तो महिलेच्या गळ्यातील चैन घेऊन जोरात तेथून धावून जातो. व्हिडिओत गेट बाहेर असलेल्या एका साथीदाराच्या बाईकवर बसतो आणि त्या परिसरातून पळ काढतो. महिलेचा आवाज ऐकून घरातील दुसरी महिला बाहेर येताना व्हिडिओत(Video) दिसत आहे. संपूर्ण घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(cctv) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचे व्ह्यूज आलेले आहेत शिवाय अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहले आहे की,''धक्कादायक घटना आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' अशा घटनांमध्ये कायम वाढ होत जात आहे'', तर अनेकांनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT