Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाबो हे काय? चक्क कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर स्पायडरमॅन मागतोय भीक; पाहा VIRAL व्हिडिओ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक जिल्ह्यातील विविध घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी कुठे प्रवाशांमध्ये हाणामारी मग कधी भररस्त्यात नागरिकांमध्ये वादविवाद. दर क्षणाला अनेक घटना घडत असतात मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व घटना काही वेळात संपूर्ण जगभर पसरतात. सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ जगभर पसरलेला आहे आणि त्याची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठी चर्चा होत आहे.

सध्या व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कल्याण शहरातील आहे. ऐतिहासिक अशा कल्याण(Kalyan) शहरातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कल्याण स्टेशन बाहेरील आहे. जिथे कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर एक स्पायडरमॅन (spiderman) भिक माकताना दिसून आलेला आहे. व्हिडिओ(Video) व्हायरल होताच अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला कल्याण रेल्वे स्थानकांचा संपूर्ण परिसर दिसून येत आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेक प्रवाशांची ये-जा दिसत आहे शिवाय अनेक प्रवशी उभे राहिलेले दिसून येत आहे. तिथेच जमिनीवर एक व्यक्ती आहे जो स्पायडरमॅनचा ड्रेस घालून भीक मागताना दिसून येत आहे. या व्यक्तीला पाहून अनेकजण त्याला पैशे देत आहेत. शिवाय अनेकजण स्पायडरमॅनचा हा गमतीदार प्रसंग मोबाईलमध्ये कैद करत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नक्की तो व्यक्ती कोण आहे हे समजू शकलेले नाही.

स्पायडरमॅनचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@shaddyman98'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''लोक काय करतील काही सांगता येत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' ठाण्यातून कल्याणमध्ये आलेला आहे'', अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : सिनेट निवडणुकीचा दुसरा निकाल हाती

IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल

Devendra Fadnavis Office: ती राडेबाज महिला मानसिक रुग्ण, सोसायटीतही घातला होता धुमाकूळ; अनेक VIDEO आले समोर

Nagpur News : गोंड गोवारी समाजाचं आंदोलन; पोलिस आणि आंदोलकांत धरपकड

Shriya Pilgonkar: 'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्रीचे क्यूट फोटो

SCROLL FOR NEXT