Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आंदोलनात वोटींग मशिन हटाव, देश बचावच्या घोषणा?; पाहा व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Voting Machine News : सध्या सोशल मीडियावर सध्या आंदोलनात वोटींग मशिन हटाव, देश बचावच्या घोषणा या संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमके काय आहे हे पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या बातमीव्हायरल होत आहे जी एका व्हायरल व्हिडिओची आहे. महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात लाखोंच्या संख्येनं जनता रस्त्यावर उतरलीय असा दावा करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय.खरंच राज्यात ईव्हीएमविरोधात एवढं मोठं आंदोलन झालंय का? याची आम्ही पडताळणी केली.मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

लाखोंचा जनसमुदाय ईव्हीएमविरोधात आंदोलन करतोय.ईव्हीएम(EVM) हटाव, देश बचावच्या घोषणा या आंदोलनात दिल्या जातायत. हा मोर्चा महाराष्ट्रातील असल्याचा दावा करून लाखो लोक रस्त्यावर उतरल्याचा दावा करण्यात आलाय.खरंच हा मोर्चा(march) ईव्हीएमविरोधात महाराष्ट्रात काढण्यात आलाय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. मात्र,त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

महाराष्ट्रात ईव्हीएम हटवण्यासाठी लोकांचा प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर आलाय. आता भाजपचा पराभव नक्की दिसतोय का? संपूर्ण विरोधक लवकरच एकत्र येऊन रस्त्यावरून सभागृहापर्यंत आवाज उठवण्याची तयारी करतील.

हा मेसेज व्हायरल होत असून, व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आलाय.निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम गडबडीमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला.काहींनी पुन्हा फेर मतमोजणी, व्हीव्हीपॅट चेक करण्याची मागणी केलीय.मात्र, हा मोर्चा कुठे काढण्यात आला? हा व्हिडिओ खरंच ईव्हीएमविरोधातील आहे का?

या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली.व्हिडिओत नीट तपासून पाहिल्यानंतर आवाज हिंदी भाषेत असल्याचं आढळून आलं.एवढा मोठा मोर्चा महाराष्ट्रात झाला असता तर बातमी झाली असती.मात्र, एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रात झाल्याचं दिसलं नाही.त्यावेळी व्हिडिओची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहुयात.

आंदोलनाचा व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. आंदोलन ईव्हीएमविरोधातच होतं मात्र, व्हिडिओ जुना आणि आंदोलन जानेवारी 2024 मध्ये दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं .आंदोलनाचं आयोजन भारत मुक्ती मोर्चाने केलं होत. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित झाल्याने जुना व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसल्याचं स्पष्ट झालंय.मात्र, हे आंदोलन दिल्लीत ईव्हीएमविरोधातच होतं.पण, आता महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात तक्रारी केल्यानं जुना व्हिडिओ व्हायरल करून महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला.मात्र, आमच्या पडताळणीत महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर आल्याचा दावा असत्य ठरला.ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT