Ghaziabad Viral Video News 
व्हायरल न्यूज

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

Ghaziabad Viral Video News : गाझियाबादमध्ये दारूच्या पैशांसाठी तरुणाने जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. CCTV फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नशेच्या पैशांसाठी तरुणाने आईवर अमानुष अत्याचार केला

  • छुप्या CCTV कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद

  • अमेरिकेतून मुलीने फुटेज शेअर करत प्रकरण उघड केलं

  • पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली

नशा करणारी व्यक्ती नशेसाठी कोणत्याही थराला जातात. ह्याचं नशेच्या पैशांसाठी एका तरुणाने आपल्या आईला बेदम मारहाण केली असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील मधुबन बापुधाम पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. ही घटना महिलेच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत उघडं केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत, कारवाई करून त्या तरुणाला अटक केली.

कविनगरचे एसीपी सूर्यबली मौर्य म्हणाले की, शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात २६ वर्षीय एक तरुण त्याच्या आईला बेदम मारहाण करताना दिसला. तपासात ही घटना मधुबन बापुधाम पोलिस स्टेशन परिसरातील जागृती विहार, संजय नगर सेक्टर २३ येथील घर क्रमांक २२ येथे घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आईला मारहाण करणाऱ्या निशांत ठाकूरला अटक केली.

शेजाऱ्यांनी सांगितले की, वृद्ध महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले. वृद्ध महिलेची मुलगी अमेरिकेत काम करते, तर तिचा भाऊ व्यसनी आहे आणि फक्त एका आठवड्यापूर्वीच त्याला ड्रग्ज पुनर्वसन केंद्रातून सोडण्यात आले.

महिलेची मुलगी तिला घरखर्च आणि आजारांच्या उपचारांसाठी अमेरिकेतून पैसे पाठवते. शुक्रवारी निशांत ठाकूरने त्याच्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या निशांतने आईचा गळा दाबून तिला मारहाण केली. वृद्ध महिलेने यापूर्वी तिच्या मुलीला तिच्या भावाच्या कृत्याबद्दल सांगितले होते. म्हणून महिलेच्या मुलीने भावाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आईच्या बेडरूममध्ये एक छुपा कॅमेरा बसवला. आणि ती अमेरिकेत बसून कॅमेऱ्यातून घरातील घडत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवायची.

या कॅमेऱ्यात तरुणीच्या भावाने आईला मारण्याचे दृश्य कैद झालं. तिने हे फुटेज शेजाऱ्यांना पाठवले, ज्यांनी नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत, कारवाई करून त्या तरुणाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

Deputy CM Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार सक्रिय;'या' जिल्ह्याचा करणार दौरा

SCROLL FOR NEXT