Leopard Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Leopard Video: दूध डेअरीत घुसून बिबट्याचा धुडगूस, लॅबमध्ये तोडफोड, काच फोडून ठोकली धूम

Leopard Cctv Footage: रात्रीच्या वेळी डेअरीच्या लॅबमध्ये घुसलेल्या बिबट्याने उपकरणांची तोडफोड केली आणि कार्यालयाची काच फोडून मोठी हानी केली. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Ahilya Nagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात बिबट्याने थेट एका दूध डेअरीत प्रवेश करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्याने उपकरणांची तोडफोड केली.

राहाता शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे आज भल्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला. परिसरात दोन बिबट्यांची झुंज सुरू असतानाच त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या मालकीच्या पंचकृष्णा दूध डेअरीत घुसला.

कुत्र्यांना चाहूल लागताच त्यांनी जोरात भुंकण्यास सुरुवात केली असता गेट जवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि समोर थेट बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. बिबट्याने डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश करत अनेक उपकरणांची तोडफोड(Vandalism) केली आहे.मात्र, बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने कार्यालयाच्या दरवाजाच्या जाड काचेला धडका घेत काच फोडून बाहेर पळ काढला.

यावेळी बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नसली तरी सदाफळ यांच्या लॅबचे मोठे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यात बिबट्यांचा(Leopard) मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

टीप: बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

SCROLL FOR NEXT