Haircut With a Knife Saam TV
व्हायरल न्यूज

Haircut With a Knife : कैची नाही तर चाकूने कापले महिलेचे केस; तरुणीची अतरंगी हेअरस्टाइल पाहिलीत का?

Haircut With a Knife VIDEO : आजवर तुम्ही कैची किंवा वस्त्ररा यांनी केस कापल्याचे पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी मोठ्या सुरीने किंवा चाकूने केस कापल्याचे पहिले आहे का?

Ruchika Jadhav

VIRAL VIDEO :

आपण सुंदर दिसावं यासाठी प्रत्येक जण काही ना काही सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. तसेच बऱ्याच व्यक्ती आपल्या केसांची विशेष काळजी घेतात. महिला असो अथवा पुरुष सर्वच सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअरस्टाइल ट्राय करतात. अशात सोशल मीडियावर आतापर्यंत कधीही न पाहिलेली एक हेअरस्टाइल व्हायरल झाली आहे.

बऱ्याच व्यक्ती सलोन किंवा पार्ललरमध्ये जाऊन वेगवेगळ्या हेअरस्टाइल कतात. त्यात केस कापणाऱ्या व्यक्ती कशा पद्धतीने कैची चालवतात त्यावर सुंदर हेअरस्टाइल अवलंबून असते. अशात आजवर तुम्ही कैची किंवा वस्त्ररा यांनी केस कापल्याचे पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी मोठ्या सुरीने किंवा चाकूने केस कापल्याचे पहिले आहे का?

नक्कीच तुमचंही उत्तर नाही असेल. मात्र प्रत्यक्षात एका व्यक्तीने आपली अनोखी कला दाखवत चाकूने केस कापून हेअरस्टाईल केली आहे. या व्यक्तीने एका तरुणीचे केस भाज्या कापण्याच्या लाकडी पोळपाटावर पसरवले आहेत. तसेच एखादी भाजी जशी चिरतात तसेच याने तरुणीचे केस कापले आहेत.

कटिंग पूर्ण झाल्यावर फेदरकट प्रमाणे ही हेअरस्टाइल दिसत आहे. हेअरकटची ही अनोखी स्टाईल एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. सध्या या हेअरस्टाइलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

@ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट केल्यात. काहींनी या हेअरकटचं कौतुक केलं आहे. तर काहींनी यावर अनेक हास्यास्पद कमेंट केल्यात. हेअरस्टाइल करतानाचा या आधी देखील असाच एक अतरंगी व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एका तरुणाची हेअरस्टाईल करताना सदर व्यक्तीने त्याच्या केसांना आग लावली होती आणि हेअरकट केला होता. आता हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

SCROLL FOR NEXT