Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: तुम्हीही मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? वेळीच व्हा सावध, धक्कादायक व्हिडिओ पाहाच!

Dont Keep Money In Mobile Cover Information Video: मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणे तुमच्यासाठी आणि तुमच्या मोबाईलसाठीही हानीकारक आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मोबाईलचे वेड आहे. प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतात. अनेकांना आपल्या मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय आहे. परंतु मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणे तुमच्यासाठी आणि तुमच्या मोबाईलसाठीही हानीकारक आहे. याची माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. या व्हिडिओमधून नवनवीन पाककलांची रेसिपीज सांगितल्या जातात, टेक्नोलॉजीबद्दल माहिती तसेच आरोग्याबद्दलही जागरुकता केली जाते. सध्या असाच एका महत्वाच्या विषयावरील व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

हा व्हिडिओ खास मोबाईलच्या पाठीमागे कव्हरमध्ये पैसे ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओमध्ये मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याचे अनेक धोके सांगितले असून त्यामुळे तुमच्या आरोग्याला आणि मोबाईललाही कसा धोका पोहोचू शकतो याबद्दलचे स्पष्टिकरण दिले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की आयफोनच्या पाठीमागे नोट ठेवलेली दिसत आहे. मात्र धक्कदायक बाब म्हणजे ही नोट मोबाईल गरम झाल्याने जळालेली दिसत आहे. पुढे या व्हिडिओमध्ये हे नेमकं का झाले? याबद्दलचे स्पष्टिकरण देण्यात आले आहे.

व्हिडिओमधील तरुणी सांगते की, जेव्हा फोनचा प्रोसेसर खूप वेगाने काम करतो तेव्हा फोन गरम होतो. फोन इतका गरम होतो की फोनला आग लागू शकते. फोनच्या मागे जी नोट ठेवलेली असते ती नोट बनवताना केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे ही नोट सुद्धा पटकन पेट घेऊ शकते.

व्हिडिओमध्ये तरुणीने सांगितलेल्या माहितीवरुन नेटकऱ्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशा घटना त्यांच्या पाहण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच काही जणांनी आजपासून असे पैसे कव्हमध्ये टाळणार असल्याचेही म्हणले आहे. हा व्हिडिओ अनामिका नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटने शेअर केला आहे. आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT