Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! एस्केलेटर सुरू होताच दोन महिला धाडकन खाली आफटल्या; अपघाताचा VIDEO व्हायरल

Viral Video Two Women Falling From Escalator: एस्केलेटरवर चढणाना किंवा उतरताना खूप घाबरतात तसंच अनेकाची मदत घेतात.

Ruchika Jadhav

Escalator Viral Video:

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळत असतात. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात, तर कधी पोट धरुन हसायला लावतात. सध्या एस्केलेटर चढत असताना महिलांचा तोल जाऊन त्या पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

एस्केलेटरवर चढणे बर्‍याच लोकांसाठी खूप कठीण असतं पण जे लोक दररोज एस्केलेटर वापरतात, त्यांच्यासाठी एस्केलेटरवर चढणं ही मोठी गोष्ट नसते. कधीकधी आपण बघतो की, काही लोकांसाठी एस्केलेटरवर चढताना किंवा उतरताना खूप घाबरतात तसंच अनेकांची मदत घेतात. पण बऱ्याचदा काही ठिकाणी एस्केलेटर शिवाय पर्याय नसतो. यावेळी मदत करणारे कोणी नसतात तेव्हा काही जण एकटेच चढू लागतात आणि नंतर अशा घटना घडतात .

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असं दिसत आहे की, साडी नेसलेल्या दोन वृध्द महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत .सर्वांत आधी एक महिला एस्केलेटरवर चढते. तर तिच्या पाठून लगेच दुसरी महिला चढत असताना पहिल्या महिलेच्या साडीचा पदर पकडते .त्यामुळे तिला पुढं जाता येत नाही .पदर धरल्यामुळे पुढे उभी असलेली महिला मागच्या महिलेवर पडते. दोघीनां पडताना पाहून त्याच्या जवळची दोन व्यक्ती त्याच्या मदतीसाठी आले नाहीत .नक्की हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणातील आहे हे समजू शकल नाही .

या व्हिडीओत दिसत आहे की ,त्या महिला पडल्यानंतर स्वा : ताला सावरतात .पण पडल्यामुळं त्या पुर्णपणे घाबरून जाताना दिसत आहे .आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आल नाही .हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने म्हटले की, पडल्यानंतर त्या दोन महिलांना जोरात लागल असेल. तर दुसऱ्या युजरने व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला म्हणाला की तुम्ही आधी मदत करायला हवी होती, तू व्हिडिओ का बनवत होतास? एकही व्यक्ती मदतीसाठी आलं नाही त्यामुळं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरील कमेंटमध्ये संताप व्यक्त केलाय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT