Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकल्या कुत्र्याची वाघाशी झुंज; कोण जिंकलं कोण हारलं? पाहा VIDEO

Viral News: जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी म्हणून वाघ ओळखला जातो. वाघाच्या वाटेला कोणी गेलं तर त्याची गय होत नाही. असाच एक कुत्रा वाघाच्या वाटेला गेला अन् मृत्यूला सामोरा गेला. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tiger And Dog Fight Viral Video:

जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी म्हणून वाघ ओळखला जातो. वाघ पाहताच सगळ्यांनाच भीती वाटते. वाघाला पिंजऱ्यात बघतानाही लोक लांबून पाहतात. जंगलातील सर्व प्राणी त्याला घाबरुन राहतात. वाघाच्या वाटेला जाण म्हणजे मृत्यूच्या तोंडाच हात घालण्यासारखे आहे. त्यामुळे कोणतेही प्राणी त्याच्यासमोर यायला घाबरतात. कधीही वाघाची शिकार होऊ शकतो अशी भीती त्यांना असते. वाघाच्या वाटेला कोणी गेलं तर त्याची गय होत नाही. असाच एक कुत्रा वाघाच्या वाटेला गेला अन् मृत्यूला सामोरा गेला. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाघाला राग येण्यासारखे काही केले तर त्या व्यक्तीची वाट लागते. असच एक कुत्र्याच्याबाबतीत झालं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वाघ साखळीला बांधलेला दिसत आहे. साखळीला बांधलेल्या या वाघाला मात्र कुत्र्याने चांगलीच टक्कर दिली. त्याच्या अंगावर धावून गेला. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणातात ना, शक्तीशाली व्यक्तीला कोणीच हरवू शकत नाही. तशीच ताकद दाखवून कुत्र्याला चांगला इंगा दाखवला आहे. कुत्र्याच्या मानेला पकडून चीत केलं आहे. या दोघांची ही झूंज पाहण्यासारखीच आहे.

वाघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 'वाघ तो वाघच त्याला कोणीच हरवू शकत नाही' अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT