RCB Vs DC Match Prediction: पहील्या विजयाच्या शोधात DC देणार RCB ला कडवी झूंज! पाहा मॅच प्रेडीक्शन अन् प्लेइंग 11

RCB Vs DC Playing 11: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध रंगणार आहे.
Rcb vs Dc
Rcb vs DcSaam Tv
Published On

RCB Vs DC Preview: सलग २ सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयाचं खातं देखील उघडता आलं नाहीये.

दिल्ली संघाकडून डेव्हीड वॉर्नर धावा करतोय, मात्र त्याचा स्ट्राइक रेट हा दिल्ली संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. दिल्लीचे गोलंदाज चांगली कामगिरी करताय मात्र फलंदाज सामना जिंकून देण्यात अपयशी ठरत आहेत.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघाने २०० पेक्षा अधिकची धावसंख्या उभारली होती. तरीदेखील गोलंदाज या धावांचा बचाव करू शकले नाही.

त्यामुळे हा सामना जर जिंकायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Rcb vs Dc
CSK VS RR IPL 2023: CSK चा पराभव अन् अंबानींची चांदी! वाचा नेमकं काय घडलं

या सामन्याबद्दल अधिक माहिती.. (RCB vs DC Match Details)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सामना क्रमांक - २०

सामन्याचे ठिकाण आणि वेळ : एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, दुपारी ३:३० वाजता.

पिच रिपोर्ट (RCB vs DC Pitch Report)

हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किती ही मोठी धावसंख्या उभारली तरीदेखील धावांचा बचाव करणं गोलंदाजांसाठी मोठं आव्हान असतं. (Latest sports updates)

Rcb vs Dc
Suryakumar Yadav In IPL 2023: मुंबईचा 'सूर्या'स्त, सलग ६ सामन्यात चौथ्यांदा गोल्डन डक वर बाद; संघाबाहेर होण्याची भिती

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11 (RCB vs DC Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore Playing 11)

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), वेन पारनेल, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज

दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals Playing 11)

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), मनीष पांडे, अक्षर पटेल, ललित यादव, रिपल पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com