Fight In Flight Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Fight Video: तुझी हिंमत कशी झाली? लेकीला हात लावल्याने वडिल संतापले; विमानात तुफान राडा

Gangappa Pujari

Fight In Flight Viral Video: सध्या सोशल मीडियावर भररस्त्यात, ट्रेनमध्ये, बसमध्ये, भांडणाचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. शुल्लक कारणावरुन प्रवाशांमध्ये वाद वाढल्याने अनेकदा इतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ होते.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विमानात शुल्लक कारणावरुन दोन प्रवाशांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. मुलीला हात लावल्याने वडिलांनी हा सगळा वाद घातल्याचे सांगण्यात येत आहे. (Viral Video In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

विमानात होणारे वाद सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. कधी सहप्रवाशाशी केलेल्या लज्जास्पद कृतीने तर कधी प्रवाशाने दारु पिवून घातलेल्या राड्याने विमानप्रवास चर्चेत येत आहे. असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विस्तारा (Vistara Flight) फ्लाईटमध्ये हा राडा झाला असून या व्हिडीओमधील व्यक्तीला हवाई सुंदरी शांत करताना दिसत आहे.

या वादाचे कारण म्हणजे फ्लाइटमध्ये मुलगी आणि वडील वेगवेगळ्या रांगातील सीटवर बसले आहेत. अचानक वडिलांना लेकीच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे दिसले. त्यामुळे वडिलांचा राग डोक्यात गेला. त्यांनी त्या व्यक्तीला खरीखोटी सुनावली. तुझी हिम्मत कशी झाली, असं म्हणत त्यांने आपल्या मुलीला हात लावणाऱ्या व्यक्तीची खरडपट्टी केली. (Viral Video)

मात्र या संपूर्ण वादाने बाकी प्रवाशांची मात्र चांगलाच गोंधळल्याचे पाहायला मिळत आहे. फ्लाईटमधील हवाईसुंदरी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुलीच्या वडिलांचा पारा काही कमी होताना दिसत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कॅप्टनला बोलावण्यापूर्वी एअर होस्टेस परिस्थिती हातळण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे. व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या वडिलांच्या बोलण्याचे समर्थन केले आहे तर काही जणांनी संबंधितावर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT