Uttarpradesh Viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Uttarpradesh Viral video : कानपूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओ एसयूव्हीने दुभाजकावर धडक दिल्याने थरारक अपघात घडला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Alisha Khedekar

  • कानपूरमध्ये स्कॉर्पिओ एसयूव्हीने दुभाजकावर धडक दिली, मोठा अपघात टळला.

  • गाडीच्या वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी अनेक वेळा फिरली.

  • एक महिला आणि दुचाकीस्वार अपघातातून थोडक्यात बचावले.

  • पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वाहतूक पूर्ववत केली, कोणतीही जखम झाली नाही.

उत्तर प्रदेशातील कानपूर देहात परिसरात २४ जुलै रोजी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओ एसयूव्हीने अचानक नियंत्रण गमावले आणि रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार धडक दिली. या धडकेनंतर गाडी अनेक वेळा फिरली आणि काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या धक्कादायक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संपूर्ण अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एसयूव्हीचा वेग अत्यंत अधिक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग ताशी १०० किमीपेक्षा जास्त होता. या प्रचंड वेगामुळे वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट दुभाजकावर आदळली. धडकेनंतर एसयूव्हीने तब्बल सहा ते सात वेळा फिरकी घेतली.

या घटनेतील एक थरारक क्षण म्हणजे, एक महिला आणि दुचाकीस्वार एसयूव्हीजवळून काही इंचांनी वाचल्याचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. हे दृश्य पाहणाऱ्यांचेही काळजाचे ठोके चुकवणारे ठरले आहे. दरम्यान, ही धडक झाल्यानंतर काही वेळातच एसयूव्ही रस्त्याच्या एका बाजूला स्थिरावलेली दिसते.

घटनेनंतर कानपूर देहात पोलिसांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून, त्यामध्ये अपघातामध्ये कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन हटवले असून, वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. या वाहनात किती प्रवासी होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी अशा घटना रस्त्यावर अधिक काळजीपूर्वक व वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT