Viral Dance Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: १ नंबर दिसतीस साडीत.. मराठी गाण्यावर तरुणीचा कडक डान्स! अदा पाहून व्हाल फिदा; व्हिडिओ व्हायरल

Girl Dance On Marathi Song Viral Video: ट्रेंडिंग गाण्यावर या तरुणीने केलेला डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत

Gangappa Pujari

Viral Dance Virao On Trending Song: सोशल मीडियावर आपल्याला असंख्य प्रकारचे डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं.

सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू...

व्हायरल व्हिडिओ...

सध्याची तरुणाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर आपल्या कला दाखवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी मेट्रोमध्ये, तर कधी चालू ट्रेनमध्ये केलेल्या कडक डान्सचे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असतील.

सध्या अशाच एका मराठी मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर माझ्या हाताला... या ट्रेंडिंग गाण्यावर या तरुणीने केलेला डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

नेटकरी झाले फिदा...

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी घराच्या टेरेसवर व्हायरल गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

प्रणया जगदाळे (Pranaya Jagdale) या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रणया जगदाळे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर' तसेच कलाकार असून इंस्टाग्रामवर तिचे तब्बल १० हजार फॉलोअर्स आहेत. तिने अनेक वेबसिरीज आणि डान्स स्पर्धांमध्ये भाग घेत मोठे यश मिळवल्याचे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसत आहे. सध्या तिच्या या डान्स व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT