Viral flight video saam tv
व्हायरल न्यूज

Viral flight video: अजब! आवडीने विन्डो सीट बुक केली, पण विमानात जाताच पाहिलं तर...; तरूणीचा व्हिडिओ व्हायरल

Passenger finds missing cushion on window seat viral video: मुंबई-उदयपूर इंडिगो फ्लाइटमध्ये महिला प्रवाशाला विंडो सीटवर कुशन नसल्याचा अनुभव आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विमान सेवांवर चर्चा सुरू झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईहून उदयपूरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानातील एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका महिला प्रवाशाने खास सूर्यास्त पाहण्यासाठी विंडो सीट बुक केली होती. मात्र विमानात प्रवेश केल्यानंतर तिने जे काही पाहिलं ते अनपेक्षित होतं. या घटनेचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्याने प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हिडिओमध्ये महिला प्रवासी आश्चर्य व्यक्त करत म्हणते, “मी मुंबई-उदयपूर फ्लाइटमध्ये आहे आणि सनसेट पाहण्यासाठी विंडो सीट बुक केली होती. पण माझ्या सीटवर सीटच नाहीये.” या तरूणीच्या सीटवर कुशनच नसल्याचं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी फक्त सीटचा सांगाडा होता. या क्लिपमुळे विमानातील सेवांबाबात चर्चा सुरू झाली.

यानंतर एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती स्पष्ट केली. गेल्या प्रवासादरम्यान संबंधित सीट ओलसर झाल्याने ती तात्पुरती काढण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. काही वेळानंतर तरूणीला तिची सीट पुन्हा देण्यात आली. व्हिडिओच्या शेवटी ती म्हणते, “मला माझी सीट परत मिळाली,” आणि संपूर्ण प्रकार मजेशीर असल्याचं तिने सांगितलं. मुख्य म्हणजे या तरूणीने तक्रारीपेक्षा हलक्याफुलक्या मजेशीर पद्धतीने ही घटना सोशल मीडियावर पोस्ट केलीये.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक काळजी घ्यावी, असं म्हटलंय. तर काहींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, इंडिगोशी संबंधित आणखी एक विचित्र प्रसंग नुकताच समोर आला होता. एका प्रवाशाला “FLYMORE” नावाच्या कूपनसह “आपण 0.0 रुपयांची बचत केली” असा प्रमोशनल मेसेज मिळाला. या प्रवाशाने याचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. यावर एअरलाइनने रिप्लाय देत प्रकरणाची दखल घेतली असल्याचं सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: एका दगडात २ पक्षी! फूड डिलीव्हर बॉयकडे तिने केली अशी डिमांड की...; व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल

Ajit Pawar Death: 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, तो भारदस्त आवाज…'; अजितदादांच्या आठवणीत रोहित अन् युगेंद्र पवार भावुक

Famous Singer Death: जगप्रसिद्ध गायकाचे अचानक निधन; संगीतविश्वाला मोठा धक्का

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी आणि अमित शहांना केजरीवालांची माफी मागावी लागेल - संजय राऊत

Rajya Sabha : उद्धव ठाकरे खासदार होणार की आमदार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT