Panipuri Stall Video: खवय्ये असलेल्या लोकांना नक्की माहीत असते की कोणत्या शहरातील कोणत्या गल्लीत कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक लोक कुठे रांगेत उभे राहतात तर कुठे आधीच बुकिंग करून ठेवतात.
अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये तेथिल नियम आणि अटी शर्थिंचं देखील लोक पालन करतात. पण पाणीपुरी खाण्यासाठी तुमच्यापुढे अट ठेवली तर..? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. एका पाणीपुरी विक्रेत्याने चक्क आपल्या अटी शर्थीवरच पाणीपुरी विक्री सुरू केली आहे.
पाणीपुरीवाल्या विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल
पाणीपुरी वाल्या एका भैय्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यांनी पाणीपुरी खायची असेल तर आधार कार्ड दाखवण्याची अट घातली आहे. त्यांच्या पाणी पुरीच्या स्टॉलवर यासंदर्भातील एक सूचना देखील लिहिन्यात आली आहे. आधार कार्ड असेल तरच पाणी पुरी मिळेल असे या स्टॉलवर लिहिले आहे. विशेष म्हणजे ही अट घातल्यानंतही या स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी दिसत आहे. (Viral News)
पाणीपुरी खाण्यासाठी अजब अटी शर्थी
या पाणी पुरीच्या स्टॉलवर केवळ आधार कार्ड दाखवण्याचीच अट नाहीये, तर फक्त पुरुषांना पाणी पुरी मिळे अशी देखील अट या भैय्याने घातली आहे. तसेच 18 वर्षांच्या आतील मुलांना पाणीपुरी मिळणार नाही असा स्पष्ट सूचना देखील या स्टॉलवर लिहिलेली आहे. तसेच 20 रुपयांत केवळ सहाच पाणी पुरी मिळतील अशी देखील अट त्याने घातली आहे. एवढ्या अटी शर्थींनंतरही या स्टॉलवर लोकांनी गर्दी केल्याचे तुम्ही पाहू शकता. या स्टॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video)
येथे पाहा व्हिडिओ...
विशेष म्हणजे ग्राहकांनी या पाणीपुरीबाबत अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. एकदा खाल्ली तर मन प्रसन्न होते, या पाणीपुरीने पोट साफ होते, खूपच चवदार पाणीपुरी आहे, अशा प्रतिक्रिया या स्टॉलवरील खवय्यांनी दिल्या आहे. एवढंच नाही तर या पाणीपुरीवाल्या भैय्याने त्याची पाणीपुरी शुगरमध्ये आणि हार्ट अटॅकमध्येही काम करेल असा दावा केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर मोठ्या प्रमाणात संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.