Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईकचा बर्थडे, असं खतरनाक celebration तुम्ही पाहिलंच नसेल, केक कापण्याचा हा Video पाहाच

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या कार्यक्रमात अनेक गोष्टी घडत असतता त्याचे व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की त्याला पाहून आपल्याला काही बोलावे सूचत नाही. सध्या अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ज्यात चक्क एका बाईकचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे.

वाढदिवसाचा तो दिवस आपल्या प्रत्येकासाठी खास असतो. मात्र गेल्या काही वर्षापासून वाढदिवस (Birthday) साजरा करण्याच्या पद्धती बदलत जात आहेत. एकेकाळी घरगुती पद्धतीने साजरे होत असलेले वाढदिवस आता, मोठ-मोठ्या माणसांत आणि आकर्षक डेकोरेश आणि मोठ्या हॉलमध्ये साजरे करण्याचे वेड आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या बाईकचा वाढदिवसाचा व्हिडिओ चर्चेत (discussion) आलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, चार ते पाच व्यक्ती एका घराबाहेर उभे आहेत. पुढे व्हिडिओत पाहिले तर दिसेल की, एका व्यक्तीने एका बाईकचे हॅडल पकडले आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात केक (Cake) आहे. जो व्यक्ती बाईकच्या चाकाजवळ उभा आहे. व्हिडिओनंतर बाईकच्या पुढच्या चाकाला एक चाकू अडकवला आहे जो कारण चाकूच्या साहाय्याने केक कापता यावा. कारण बाईकचा वाढदिवस साजरा करता यावा यासाठी.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @Shahrcasm या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला पसंती दिलेली आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजरने विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजर्संनी लिहिले आहे की,''लोक काय करतील सांगता येत नाही'' तर दुसऱ्या यूजर्संनी लिहिले आहे की,''वा काही तरी वेगळाच व्हिडिओ (Video) पाहायला मिळाला''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT