Recruitment Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Recruitment Viral Video : गावात बेरोजगार तरुणांसाठी मोठी भरती; काम संपताच रात्री मिळणार रोजचा पगार, पाहा VIDEO

Recruitment In Farm Video Viral : या कामासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. तसेच यासाठी कोणतीही शारीरिक चाचणी देखील द्यायची गरज नाही.

Ruchika Jadhav

राज्यात बेरोजगारी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. प्रत्येक तरुण हाताला काम शोधत आहेत. मात्र नोकरी नसल्याने अनेक तरुण आता हतबल झाले आहेत. अशात सोशल मीडियावर एका मोठ्या भरतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू येईल तर काहींना खरोखर रोजगार मिळेल.

व्हिडीओमध्ये भरतीबाबत एका तरुणीने माहिती दिली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू झाली की, गावी सर्वत्र शेतीची पेरणी सुरू होते. त्यात भाताची शेती करताना सुरुवातीला पेरणी करावी लागते. तर हा महिना पेरणीचा आहे. या महिन्यात सर्वत्र तांदूळ लावले जातात.

आता बेरोजगार तरुणांसाठी एका तरुणीने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये ही तरुणी स्वतः देखील शेतात काम करत आहे. यामध्ये तिने मजेशीर अंदाजात सांगितलं आहे की, या कामासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. तसेच यासाठी कोणतीही शारीरिक चाचणी देखील द्यायची गरज नाही. येथे काम केल्यावर लगेचच रात्री तुमच्या हातात तुमच्या कामाचे पैसे मिळणार असं सुद्धा या तरुणीने सांगितलं आहे. `

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे अनेक व्यक्तींचा उदरनिर्वाह हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील घरात बसून असाल आणि सध्या कोणत्या कामाच्या शोधात असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खास ठरू शकतो. किंवा एक मजा तसेच विरंगुळा म्हणून सुद्धा तुम्ही शेतात काम करू शकता.

शेतात काम केलेल्या व्यक्तीचे आरोग्य देखील चांगले राहते. ज्या व्यक्तीचा थेट मातीशी संबंध येतो त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या सुद्धा दूर होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा यंदाच्या पावसाळ्यात शेती करू शकता. तरुणीचा हा व्हिडिओ @akshansha.toppo.395 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण महाराष्ट्रात पुढील २ दिवसात पावसाची शक्यता

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

SCROLL FOR NEXT