सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूटचा गॅगस्टर स्टाईल व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तीन पांढऱ्या SUV कारच्या ताफ्यासह नवरी-नवरदेवाची एंट्री.
बॉडीगार्ड्ससोबत नवरदेव आणि वधूचा डॉन स्टाईल लूक मुळे नेटकरी थक्क.
सोशल मीडियावर एक प्री-वेडिंगचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यातील भावी नवरदेव आणि नवरीबाईचा थाट आणि एंट्री पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलाय. नवरी आणि नवरदेवाची एंट्री ही एखाद्या गॅगस्टरप्रमाणे होते. भावी नवरदेव नवरी एका कारमधून उतरतात त्यानंतर ते एखादी डील करण्यासाठी भेटतात या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय.
व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवात तीन पांढऱ्या रंगाच्या एसयूवी कारच्या ताफ्यापासून होते. एका उड्डाणपुलावरून हा ताफा जात असतो. यातील पहिली कारमध्ये नवरदेव आपल्या बॉडीगार्ड्सोबत बसलेला आहे. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील सीन सारखे वाटत आहे. यानंतर दृश्य बदलते आणि आणखी एक पांढरी एसयूव्ही दिसते, ज्यामध्ये वधू तिच्या बॉडीगार्डसह बसलेली आहे. मुलीची स्टाइलही देखील एखाद्या लेडी डॉनसारखी आहे.
यानंतर दोन्ही बाजूकडील बॉडीगार्डस एकमेकांची तपासणी करतात. त्यानंतर वधू आणि नवरदेव आपआपल्या कारमधून बाहेर पडतात. ते एकमेकांना भेटतात. नवरदेव तिला एक सुटकेस देतो, नवरी ती सुटकेस घेते आणि कारच्या एका बोनेटवर ठेवून उघडते. सर्व दृश्य स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आले आहे. त्यामुळे हे दृश्य प्रभावी वाटतात.
नवरदेवाने दिलेल्या सुटकेसमध्ये नवरी मुलीला दोन गुलाबाची फूल दिसतात, त्यासोबत एक आंगठी आणि त्यांच्या साखरपुड्याची तारीख लिहिलेली चिठ्ठी असते. हा ढासू व्हिडिओ युट्यूबवर शेअर केलेला आहे. जवळपास १ मिनिट ३० सेकंदांचा हा अनोखा प्री-वेडिंग शूट आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय.
तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होतोय. काही लोक याला खूप सर्जनशील आणि अद्वितीय म्हणत आहेत, तर काही लोक म्हणत आहेत की प्री-वेडिंग शूट्सचे नवीन पैलू आता उघड होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.