Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : साडी नेसून बिल्लो राणी गाण्यावर महिलेने लगावले ठुमके; प्रवाशी टकमक पाहतच राहिले

Dance Viral Video : साडी नेसून एका महिलेने थेट मेट्रोमध्ये डान्स केला आहे. महिलेने डान्स सुरु करताच सर्व प्रवासी थक्क झाले आणि टकमक महिलेकडे पाहत राहिले होते.

Ruchika Jadhav

मेट्रो ट्रेन आणि येथील अतरंगी गोष्टींचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेट्रो ट्रेनमध्ये कधी कपल्सचा रोमान्स पाहायला मिळतो तर कधी अतरंगी भन्नाट रील्स व्हिडिओ बनवताना पाहायला मिळतात. रिल व्हिडिओ बनवण्याच्या नादात कोण काय करेल काहीच सांगता येत नाही. अशात आता देखील एका महिलेचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही माहीला मेट्रो ट्रेनमध्ये उभी आहे. सुरुवातीला म्युजीक सुरू होते आणि नंतर बिल्लो राणी गाणं वाजतं. या गाण्यातील एका कडव्यावर महिलेने डान्स केला आहे. यावेळी तिने वार्ली पेंटमधील सिल्क साडी परिधान केली आहे. या साडीवर सुंदर नक्षीकाम देखील केलं आहे. सुंदर साडीत ही महिला चेहऱ्यावर सुंदर हावभाव दाखवत डान्स स्टेप्स करत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेचा डान्स सुरु असताना सर्व व्यक्ती तिच्याकडेच टकमक पाहत राहतात. सर्व जण आपल्याकडे पाहत आहेत या भावनेने अनेक व्यक्तींना लाज वाटते. मात्र इथे ही महिला सर्वांसमोर बिंधास्तपणे डान्स करत आहे. महिलेचा व्हिडिओ @swatisharma2543 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा आणि हॉर्ट इमोजीचा वर्षाव केला आहे. काहींनी यात महिलेचं कौतुक केलं आहे. ती जराही न लाजता डान्स करत आहे हे फार कठीण काम आहे, असं एकाने कमेंटमध्ये कौतुक करत लिहिलं आहे. तर काहींनी महिलेवर टिकेचा वर्षाव केला आहे. तिच्या व्हिडिओवर अतरंगी कमेंट केल्या आहेत. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत महिलेने आपले सर्व फोटो आणि या गाण्यावरील व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

महिलांचा ट्रेनमध्ये गरबा

काही दिवसांपूर्वी महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळला होता. ट्रेनमध्ये गरबा खेळतानाचा महिलांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. सध्या प्रत्येक महिला नोकरी करते. त्यामुळे कामाच्या व्यापात सण साजरे करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या महिलांनी ट्रेनमध्येच आपला नवरात्रोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी साडी नेसून गरब्यावर ठेका धरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT