Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: परदेशी महिला पाहून अप्पाचा सुटला ताबा, सेल्फी काढताना जे केलं त्यानं सगळेच अवाक् 

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय घडले तुम्ही पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. ते इथली संस्कृती आणि लोक जाणून घेतात आणि समजून घेतात आणि ते त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात. वसुदेव कुटूंबकम् अशी आपल्या देशाची संस्कृती आहे. त्यामुळे आपला देश परदेशी लोकांना खूप आकर्षित करतो.  

वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरांनी भरलेल्या या भारत भूमीला प्रत्येकाला भेट द्यायची असते. आपल्या देशातील लोकही परदेशी पाहुण्यांचे स्वागत खूप छान करतात, पण असे काही लोक आहेत ज्यांच्या वाईट कमांमुळे देशाची प्रतिमा या परदेशी पाहूण्यांपुढे मलीन होते. अलीकडे असाच एक व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होत आहे. जिथे एका पुरुषाने परदेशी महिलेसोबत असे कृत्य केले.

अप्पाने परदेशी महिलेसोबत केला असा प्रकार

राजस्थानला भेट देण्यासाठी आलेली एक परदेशी महिला तिथल्या एका पुरुषासोबत सेल्फी घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुरुषाला स्त्रीची भाषा कळत नाही. ती स्त्री त्याला वारंवार कॅमेराकडे बघायला सांगते पण तो माणूस आपल्याच विचारात गढून जातो. त्यानंतर महिला त्याला पकडून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, साठी ओलांडलेला तो पूरूष स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि महिलेच्या गालाचे चुंबन घेतो. त्यानंतर ती महिला तिथून दूर जाते आणि मागे उभी राहते. चुंबन घेतल्यावर अप्पा मात्र हासताना दिसत आहे.

व्हिडिओवर कमेंट करून नेटकरी देत आहेत प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @flirting.lines नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला ही बातमी लिहिपर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.

मोठ्या संख्येने लोकांनी व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत आणि अप्पाच्या या कारनाम्यावर प्रतिक्रीयाही दिली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले - काकाचा आनंद बघा. दुसऱ्याने लिहिले - मी कुस्ती सोडली आहे, मी लढाई विसरलो नाही. तिसऱ्याने लिहिले -  हम खाते रह गए झपकियां, ताऊ ले गया पप्पियाँ।. चौथ्याने लिहिले – अप्पाने संधीचा फायदा घेतला.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT