Young Man Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्यक्ती प्रवासा दरम्यानचे व्हिडिओ व्हायरल करत असतात. प्रवासा दरम्यान शूट केलेल्या व्हिडिओत अनेक व्यक्तींना त्यांचा जीव गमवावा लागतो तर अनेकदा धोकादायक घटनाही घडतात. सध्या असाच काहीसा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने धावत्या ट्रेनच्या इंजिनवर झोपून प्रवास केलेला आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण आहे जो चक्क धावत्या ट्रेनच्या इंनिजनवर झोपलेला दिसत आहे. झोपून तो रील्स व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत आहे. कोणत्याही सुरक्षितेच्या साधनांचा वापर करुन तो इंजिनवर झोपलेला आहे. तरुणाचा जराही तोल गेला असता तर तो सरळ धावत्या ट्रेनमधून खाली पडला असता.
तरुणाचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@ManojSh28986262'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,''रेल्वेच्या इंजिनवर चढून व्हिडिओ बनवतोय हा व्यक्ती, त्याला जीवाची पर्वा नाही!!'',असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही.
व्हिडिओ व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे,''रील वाल्यानी त्याला सांगितलं होत का चढ डब्यावर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''रील वाल्यानी त्याला सांगितलं होत का चढ डब्यावर'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''हे फक्त पिक्चर मध्ये बघितलं होतं आज रियल मध्ये बघत आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.