Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्तच! धुळीत पडलेल्या कारवर साकारले अद्धभुत चित्र...VIDEO होतेय व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Drowning Taken On The Car

देशभर अनेक कलाकार मंडळी आहेत. अनेकांना त्यांची कला लोकापर्यंत पोहचण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात. कलाकार म्हटला की तो आपली कला कुठेही आणि कोणतीच वेळ पाहत नाही. कला ही कलाकाराच्या अगांत भिनलेली असते. त्यातल्या त्यात चित्रकार असेल तर कोणतेही चित्र तो अगदी सहज आणि हुबेहुब उमटवतो. मग त्याला कागदच पाहिजे असं नाही. सध्या सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका व्यक्तीने रस्त्यावर धुळीत उभ्या असलेल्या गाडीवर उत्तम चित्र साकारले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आपल्याला दिसते की, एक तरुण रस्त्यावर उभी असलेल्या एका कारजवळ येतो. कारच्यापाठीमागच्या काचेवर मोठ्या प्रमाणात धुळ बसलेली असते. काही वेळातच तो तरुण एका ब्रश आणि आपल्या हाताच्या साहाय्याने काचेवर धुळीतून टीव्हीचे चित्र काढतो. काही वेळानंतर त्यावर लहानसे घड्याळ आणि एक मुलगा असे चित्र काढतो. शेवटी सर्व चित्र काढून झाल्यानंतर आपल्यालाच त्यावर विश्वास बसणार नाही.

सध्या सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील@ThebestFigenया पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या आधी आपण आपल्या परिसरात ही पाहिले असेलच धुळीत उभ्या असलेल्या कारवर अशाच प्रकारचे अनेक कलाकृती साकारलेल्या असतात.

एक्सवरील या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या असून विविध प्रतिक्रिया व्हिडिच्या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,' आश्चर्यकारक कौशल्य' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'कलाकार कुठेही आपली कला दाखवू शकतात' तर आणखी एका यूजरने लिहिले,'मस्तच'. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळत असून लाखोंच्या घराच व्ह्यूज मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT