Delhi Metro Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतलं मंदिर पाहिलंत का? महिलांनी गायलेलं भजन तुफान VIRAL

Delhi Metro Viral Video: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं एखादा फोटो असो वा व्हिडीओ तात्काळ व्हायरल होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Viral Video

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं एखादा फोटो असो वा व्हिडीओ तात्काळ व्हायरल होतो. या प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या प्रत्येक पोस्टची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर याआधी दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

दिल्ली मेट्रोतील कधी महिलांची तसंच पुरूषांची हाणामारी, तर कधी रोमान्स आणि कधी डान्सचे व्हिडीओ आपण पाहिले असतील. आता दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. काही महिलांनी थेट दिल्ली मेट्रोत भजन गायंल आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, काही महिला या मेट्रोत बसण्यासाठी सीट न मिळाल्यामुळे खाली बसलेल्या आहेत. अशातच खाली बसलेल्या महिला चक्क भजन गाण्यास सुरुवात करतात. तसंच मेट्रोत उभ्या असलेल्या तसंच सीटवर बसलेल्या इतर प्रवासी महिला भजनात त्यांना साथ देत आहेत. भजन गातानाचा महिलांचा जोरदार उत्साह आपल्याला व्हिडीओच्या माध्यमातून दिसतोय. मेट्रोमधील प्रवाशाने आपल्याजवळील मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनं नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये काही महिला भजन गाताना दिसत आहे. याआधी काही तरूणांनी नवरात्रीच्या निमित्ताने दिल्ली मेट्रोत भजन गायल होत. सदर व्हिडीओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @ndc.delhiया इन्स्टांग्राम अकाऊटंवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'कीर्तनाचे ठिकाण म्हणजे दिल्ली मेट्रो'.

व्हायरल व्हिडीओला हजारोंपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'दिल्ली मेट्रोचा हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. दुसर्‍याने लिहिले की, 'हा दिल्ली मेट्रोच्या आतील सर्वात आश्चर्यकारक व्हिडिओ आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT