Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video: तुफान परफॉर्मन्स! अल्लू अर्जुनच्या गाण्यावर महिलांचा जलवा; डान्स VIDEO एकदा पहाच

Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी अल्लू अर्जुन या प्रसिद्ध कलाकाराच्या प्रसिद्ध अशा गाण्यावर डान्स केलेला आहे.

Tanvi Pol

Women Dance Video: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या चित्रपटाची चर्चा होत आहे. चित्रपटातील कथा असो वा त्यातील गाणी प्रत्येक सामान्य माणसाच्या तोंड पाठ झालेली असून त्यावर विविध रिल्सही बनवले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर काही महिलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी पुष्पा२ या चित्रपटातील एका गाण्यावर धमाकेदार डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओतील महिलांनी याआधीही अनेक डान्सचे रिल्स केलेले दिसून आले आहे. त्यात पुन्हा एकदा त्यांनी 'पुष्पा २' यामधील ''किसीक'' या गाण्यावर रिल्स व्हिडिओ बनवला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता डान्स(Dance) करत असलेल्या फक्त तीनच महिला आहे, ज्यांनी सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि त्यामध्ये जबरदस्त अशा डान्स स्टेप्स करत आहेत. सध्या यांच्या डान्सच्या व्हिडिओला नेटकरी वर्गातून पसंती मिळत आहे.

व्हिडिओ कुठे पाहता येईल?

महिलांनी केलेला डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून त्यावरील ''mansi.gawande.73'' या अकाउंटवर ४ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ४ हजारहून अधिक यूजर्संनी महिलांनी केलेल्या डान्सला पसंती दिलेली असून दिवसेंदिवस व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत. या अकाउंटवर तुम्हाला या महिलांचे अनेक डान्सचे हजारो व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवलेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला फक्त पसंती मिळालेली नाही तर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्सही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अप्रतिम नृत्य सादरीकरण'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खुप खुप छान ताई'' तर ''खुप छान'',अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT