Pune Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune Video: बसमध्ये छेड काढणाऱ्याला महिलेने शिकवला धडा; सपासप २५ चापटा मारल्या; पुण्यातील VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या पुणे शहरातील एक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला प्रवासी महिलेने चोप दिला आहे. सध्या महिलेचे कौतुक होत आहे.

Tanvi Pol

Pune Video: पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुणे शहरात असे असताना एसटी बसमध्ये एका दारुड्या व्यक्तींने महिलेची छेडछाड होत असताना त्या महिलेने त्या व्यक्तीला चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नेमके काय घडले?

पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेली एक महिला आपल्या पती आणि मुलासह प्रवास (Travel) करत होत्या. यावेळी मध्य धुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी त्या महिलेने रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

महिलेने नंतर या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता जवळजवळ अर्धा तास त्या महिलेने त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डाबून ठेवले, त्या नंतर त्यांनी गरसेवकयांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला त्या नंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'': बस मध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला प्रवासी महिलेने दिला चोप'',असे लिहिले आहे. तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी महिलेचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT