Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गोरेगाव स्टेशनवर थरार! लोकल ट्रेन पकडताना तोल गेला, प्रवासी धाडकन प्लॅटफॉर्मवर कोसळला; पुढे काय घडलं? पाहा VIDEO

CCTV Footage: सोशल मीडियावर सध्या मुंबई शहरातील एका स्टेशनवर घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक विचित्र अशा अपघांताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग या अपघांताचे बऱ्याचदा मुळ कारण व्यक्तीचा निष्काळजीपणा असतो.याचा वेळोवेळी प्रत्यय आपल्याला व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून पाहालमा मिळतात.सध्या सोशल मिडियावर पुन्हा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.ज्यात एक व्यक्तीने धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात जीव गमावला असता.

आपल्याला प्रवास करताना अतिघाई न करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे कानाडोळा करत जीव गमावून बसतात.सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे (Railway) स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.जो पाहून तुम्हाला मनात धडकी भरेल.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेला गोरेगाव (goregaon)रेल्वे स्टेशनवरील असल्याचे समजते.व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की लोकल ट्रेन रेल्वे स्टेशनवरुन जात असते. तेवढ्यात एक व्यक्ती एका लोकलच्या डब्यातून उतरुन त्याच धावत्या लोकलच्या दुसऱ्या डब्ब्यात चढण्याचा प्रयत्न करतो मात्र धावती लोकलमध्ये चढताना त्या व्यक्तीचा तोल जातो आणि तो लोकलच्या खाली पडतो मात्र लोकलच्या खाली जानार तो पर्यंत प्लॅटफॉर्म असलेला एका व्यक्ती त्याला वाचवतो.संपूर्ण घटना प्लॅटफॉर्म असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला सीसीटीव्ही(CCTV) फुटेज व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील@saamtv या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओला ४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यात एका यूजरने लिहिले आहे की,'माणुसकी कुठे तरी आहे , येवढ्या मोठ्या शहरात'' तर याना काय ऐवढी घाई असते''तर अनेक यूजरने वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT