Wedding Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO : भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांचा 'गुलाबी साडी'वर जबरदस्त डान्स, पाहा!

Groom Friends Dance On Gulabi Sadi Song: लग्नाचे अनेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर नवरदेवाच्या मित्रांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या मित्रांनी 'गुलाबी साडी' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ हे लग्नातील असतात. लग्नातील डान्स, गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यात अनेक व्हिडिओ हे नवरीच्या एन्ट्रीचे असतात. नवरीच्या एन्ट्रीला तिच्या मैत्रिणी तर नवरी स्वतः डान्स करते. मात्र, एका लग्नाच नवऱ्याच्या एन्ट्रीला नवरदेवाच्या मित्राने डान्स केला आहे. त्यांनी गुलाबी साडी या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका ग्राउंडमध्ये लग्न होत आहे. या ग्राउंडमध्ये सर्व नातेवाईक बसलेले दिसत आहेत. या लग्नात अचानक मागून नवरदेवाचे मित्र डान्स करत येताना दिसतात. नवरदेवाचे मित्र गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करत स्टेजच्या दिशेने येताना दिसत आहे. नवरदेवाच्या मित्रांनी डोक्यावर पदर घेतल्यासारखी ओढणी घेतली आहे. त्यांनी मस्त स्टेप्स करत हा डान्स केला आहे. सगळ्यांच्या स्टेप्स एकदम परफेक्ट होत्या. नवरदेवाच्या मित्रांचा हा डान्स खूपच मस्त होता. एखाद्या मुलीला लाजवेल असा डान्स त्यांनी केला आहे. यावेळी लग्नमंडपातील लोक त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. त्यांच्या या डान्सने सर्व वऱ्हाडीमंडळी हसत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

colorsplash_eventhouse_ या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'या मुलांचा नादच करायचा नाही', 'खूपचं मस्त डान्स' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT